विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nariman Point रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) दक्षिण मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरातील ४.२ एकर जमीन तब्बल ३,४७२ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार ही डील मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानली जात आहे. या जमिनीची किंमत सुमारे प्रति एकर ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त ठरली आहे.Nariman Point
ही जमीन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) कडून विकली गेली असून, विद्यान भवन मेट्रो स्टेशनच्या वर असलेल्या या जागेचा समावेश मेट्रोच्या अॅक्वा लाईन प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात होत आहे. RBI ने या व्यवहारासाठी तब्बल २०८ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क भरला आहे.Nariman Point
सुरुवातीला MMRCL ने ही जमीन लिलावाद्वारे विकण्याची योजना आखली होती. नाईट फ्रँक इंडिया या रिअल इस्टेट कन्सल्टन्सीला ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमण्यात आले होते. अनेक मोठ्या विकासक कंपन्या आणि प्रायव्हेट इक्विटी फंड्सनी या व्यवहारात रस दाखवला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेने थेट खरेदीची इच्छा व्यक्त केल्यानंतर MMRCL ने लिलाव रद्द केला.
या जमिनीला अंदाजे १६ लाख चौरस फूट विकासक्षमता आहे. ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) संबंधित नियमांमुळे या प्रकल्पासाठी परवानगी दिलेला फ्लोअर स्पेस इंडेक्स (FSI) अधिक आहे.
सध्या RBI चे मुख्यालय फोर्ट येथे आहे. त्याशिवाय बँकेची कार्यालये बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, सीबीडी बेलापूर आणि नवी मुंबईसह विविध ठिकाणी आहेत. कर्मचारी निवासासाठी मुंबईभर अनेक प्रकल्पही रिझर्व्ह बँकेकडे आहेत.
Reserve Bank of India buys land in Nariman Point for Rs 3,472 crore
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा