पुणे : Modi’s 75th birthday पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त, पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे एक ड्रोन लेजर शो आयोजित करणार आहेत. यात पंतप्रधानांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरी दाखवली जाणार आहे. Modi’s 75th birthday
पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा शो आयोजित केला जाणार आहे. ‘ज्योतीने तेजाची आरती’ नावाचा हा शो महाराष्ट्रात होण्याची पहिलीच वेळ असल्याचं मोहोळ यांनी सांगितलं. या प्रकारचे शो अयोध्या किंवा वाराणसी मध्ये मात्र याआधी झालेले आहेत.
पंतप्रधान मोदी यांचा ७५वा वाढदिवस हा देशभरात साजरा केला जाणार आहे. १७ सप्टेंबर पासून साजरा केल्या जाणाऱ्या ‘सेवा पंधरवडा’ या अंतर्गत मोदींचा वाढदिवस विविध उपक्रमांद्वारे साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी, १६ सप्टेंबर रोजी अपंगांसाठी ड्रोन शो, तसेच अपंगांसाठी मदत शिबिर आणि पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर संगीतमय संध्याकाळ होणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केलं. तसेच पुण्यातील ७५ हजार विद्यार्थी हे पंतप्रधान मोदींना पोस्टकार्डद्वारे शुभेच्छा देखील देणार आहेत. Modi’s 75th birthday
या कऱ्यक्रमाचे उद्दिष्ट हे विकसित भारताच्या स्वप्नाची झलक दाखवणे हा आहे. या ४५ मिनिटांच्या ड्रोन शो मध्ये एकूण १,००० ड्रोन उडवली जाणार आहेत. यात पंतप्रधान मोदी यांच्या कामगिरीसोबतच पुण्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वाच्या खुणा देखील अधोरेखित केल्या जातील. पंतप्रधानांनी कल्पना केलेल्या विकसित भारताकडे जाण्याच्या प्रवासाचे चित्रण करण्यात येणार आहे. या शो साठी हजारो ड्रोन जेव्हा अवकाशात झेपावतील तेव्हा पुण्याच्या ३-४ किलोमीटर परीसारपर्यंतच्या भागातील सर्व नागरिकांना हा बघता येईल.
सोमवारी (त.१६) स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे. यात दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत दिव्यांगांसाठी सहाय्यता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० आवश्यक साहित्यांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. शिबिरानंतर याच ठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री १० पर्यंत संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते यांची लाईव्ह कॉन्सर्ट होईल. याच दरम्यान रात्री ८ वाजता ‘ज्योतीने तेजाची आरती’ हा ऐतिहासिक ड्रोन शो होणार आहे. Modi’s 75th birthday
‘Drone show’ organized in Pune to mark PM Modi’s 75th birthday
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा