विशेष प्रतिनिधी
मुंबई : Suraj Chavan : सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यावर कारवाई करण्याची मागणी करायला गेलेल्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांची सातत्याने बढती होताना दिसत आहे. आता संबंधित धोरण ठरवणाऱ्या समितीत सुरज चव्हाण यांची स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागली आहे. त्यामुळे असभ्य वर्तन केल्यामुळे शिक्षा मिळणे ऐवजी प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात की काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
जुलै २०२५ मध्ये लातूर जिल्ह्यातील एका कार्यक्रमादरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी खेळण्याच्या प्रकरणावरून छावा संघटनेचे कार्यकर्ते आंदोलन करत होते. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी घाडगे यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार व्हिडिओद्वारे रेकॉर्ड झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल झाला. मारहाणीनंतर चव्हाण फरार झाले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र, किरकोळ मारहाणीची कलमे लावून त्यांना लगेच जामीन मिळाला, ज्यावर राजकीय दबावाचा आरोप झाला. या घटनेनंतर चव्हाण यांचा युवक काँग्रेसमधील पदाचा राजीनामा घेण्यात आला. मात्र, आता ऑगस्ट २०२५ मध्ये पक्षाच्या कोअर कमिटीने त्यांना प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्त केले.
आता याच सुरज चव्हाण यांची वर्णी राज्यातील युवकांसंबंधीचे धोरण ठरवणाऱ्या समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून लागली आहे. युवकासंबंधीचे धोरण ठरवणारी ही समिती क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. सध्या क्रीडा मंत्रालय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे आहे. माणिकराव कोकाटे हेच क्रीडामंत्री आहेत. २० सदस्य असणाऱ्या या समितीत सुरुवातीला १७ सदस्यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समाविष्ट करण्यात आले. तरीही धोरण ठरवण्यात शासनाला अडचणी भासू लागल्या. म्हणून शासनाने भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या एकेक आमदाराला समितीत समाविष्ट केले. त्यानंतर अजित पवारांनी या समितीची एक आढावा बैठक घेतली. अजित पवारांना या समितीत पुन्हा काही विशेष सदस्यांची गरज भासली म्हणून त्यांनी सुरज चव्हाण यांच्यासह दोन कार्यकर्त्यांना समाविष्ट करून घेतले. अशा प्रकारे सोम्या-गोम्याला समाविष्ट करत ही सदस्य संख्या ४१ वर जाऊन पोहोचली आहे.
युवकांचे धोरण ठरवणाऱ्या या समितीत आता १५ आमदार आहेत. पण एकही खेळाडू या समितीत नाही. एकाही खेळाडूचा समावेश नसणारी ही समिती आता राज्यातील युवकांचे क्रीडा विषयक धोरण ठरवणार आहे! रमी प्रकरणावरून चर्चेत आलेले राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्यासाठी मारहाण करणाऱ्या सुरज चव्हाण यांना देखील आता समितीत सामावून घेतले आहे.
राजकारणात आता सभ्य वर्तन केल्यामुळे शिक्षा मिळणे ऐवजी असभ्य वर्तनाला बढती मिळते की काय, असा प्रकार पडत आहे. असे दिसून येते.
Is punishing rude behavior productive instead of rewarding it? Suraj Chavan’s promotion again!
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा