विशेष प्रतिनिधी
मुंबई : Yogesh Kadam गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत मोठा दावा केला आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासोबतच इतर अनेक विषयांवर आपले म्हणणे मांडले. Yogesh Kadam
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलतांना कदम म्हटले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मराठी मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. तसेच यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री कालावधीवर देखील टीका केली. त्यांच्या मते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईतील मराठी माणसांसाठी ते काहीही करू शकले नाहीत. उलट, एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न सोडवला आणि गिरणी कामगारांचे प्रश्न देखील मार्गी लावले.
मंत्रिमंडळातील कामकाजाबद्दल बोलताना कदम यांनी स्पष्ट केले की, कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये कोणताही संघर्ष नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांना कामासाठी पूर्ण मोकळीक दिलेली आहे. त्याच बरोबर कदम यांनी सायबर गुन्ह्यांविरोधात घेण्यात येणाऱ्या कठोर उपाययोजनांची माहिती दिली. Yogesh Kadam
तसेच कदम यांनी सांगितले की, अन्न व औषध प्रशासन विभागात ३७४ नवीन अन्न निरीक्षकांची भरती झाली आहे. त्यामुळे आता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र अन्न निरीक्षक कार्यरत राहणार आहेत. या संदर्भात दोन नवीन प्रयोगशाळांनाही मंजुरी मिळाली असून, जुन्या प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण सुरू आहे.
पुण्यातील बेळबाग चौकात विसर्जनाच्या रात्री घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणावर बोलतांना कदम म्हटले की, ‘पुण्याच्या गणेशोत्सवात महिला पत्रकाराचा विनयभंग आणि छायाचित्रकारांशी झालेले गैरवर्तन या घटना गंभीर स्वरूपाच्या आहेत.’ याबाबत पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश देणार असल्याचे देखील कदम यांनी या कार्यक्रमात जाहीर केले. पत्रकार समाजाच्या हितासाठी काम करत असतो त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले व चुकीच्या घटनांवर तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे, असेही कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. Yogesh Kadam
Thackeray brothers’ efforts to attract Marathi voters will fail; Yogesh Kadam
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा