विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे जिल्ह्यात पर्यावरणपूरक पर्यटनाला (इको टुरिझम) चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात १५ ठिकाणांची निवड केली असून, तेथे मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. Eco-tourism
पावसाळ्यात जिल्ह्यातील मुळशी, भोर, जुन्नर, मावळ आदी भागांतील धबधबे, घाट, किल्ले पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र, तिथे सुविधा नसल्यामुळे अडचणी वाढतात. त्यामुळे तिकीट काउंटर, स्वच्छतागृहे, बसण्याची सोय, चेंजिंग रूम्स आदी सुविधा उभारण्याचे नियोजन आहे.
राजगड, रायरेश्वर, तिकोना, भाजे, कडबनवाडी, नाणेघाट, ताम्हिणी, मयूरेश्वर, पवना, अंबोली अशा १५ ठिकाणी ही कामे करण्यात येणार आहेत.
या उपक्रमामुळे पर्यटनास चालना मिळेल तसेच स्थानिकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. प्रशासनाचे उद्दिष्ट डिसेंबर २०२५ पूर्वी कामांना सुरुवात करण्याचे आहे.
Eco-tourism’ to be promoted in Pune district, facilities to be set up at 15 places
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा