विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jan Arogya Yojana एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेमधील आजारांची संख्या वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत १,३५६ आजारांवर उपचाराची सोय होती. आता २,३९९ आजारांवर उपचार होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी ‘वर्षा’वर झालेल्या बैठकीत याला मान्यता देण्यात आली.
पाच लाखांपेक्षा जास्त रकमेच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारांसाठी कॉर्पस फंड निर्माण करण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली. महात्मा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य या दोन्ही योजनेत सूचीबद्ध असलेल्या रुग्णालयांचे मॅपिंग करावे. तालुक्यात ३० खाटांचे नसल्यास अशा ठिकाणी उपलब्ध रुग्णालयात योजनेचा लाभ देऊन देयकाच्या अदागीची व्यवस्था करावी, अशा सूचना मुख्यत्र्यांनी या बैठकीत दिल्या. Jan Arogya Yojana
जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांना त्यांची देयके वेळेत देण्यात यावीत. योजनेतील उपचार, रुग्णालये, लाभ यांची माहिती मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ॲप तयार करावे. त्यामध्ये चॅटबॉटद्वारे सर्व माहिती मिळण्याची व्यवस्था करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर करता येऊ शकतील अशा २५ उपचारांचा योजनेत समावेश करावा. उपचारांच्या दर निश्चितीला मान्यता देण्यावर चर्चा करण्यात आली. आता रुग्णालयांना श्रेणीनुसार दर देण्याची पद्धत बंद करून राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या धोरणानुसार गुणवत्ता प्रमाणपत्र धारक रुग्णालयांना आणि आकांक्षित जिल्ह्यातील रुग्णालयांना प्रोत्साहनपर अधिकची रक्कम देण्यात येणार आहे. Jan Arogya Yojana
Jan Arogya Yojana now covers 2,399 diseases, decision taken in meeting chaired by Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- Laxman Hake : मराठा आरक्षण आंदोलनापुढे हतबल होऊन ओबीसींचे आरक्षण संपवले, लक्ष्मण हाके न्यायालयात दाद मागणार
- cabinet meeting : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ, मेट्राेला गती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- Navnath Ban : राऊतांनी राहुल गांधींच्या अपयशी प्रयोगांचे कौतुक थांबवावे- नवनाथ बन
- Gunaratna Sadavarte : मुख्यमंत्री ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून त्यांना टार्गेट करू नका; सदावर्तेंचा इशारा