एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!

एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!

Bandu Andekar

विशेष प्रतिनिधी

पुणे : मुलगा कृष्णा आंदेकर याला हजर केले नाही तर त्याच्या एनकाऊन्टर करू अशी धमकी पाेलीसांनी दिल्याचा आराेप गॅंगस्टर बंडू आंदेकर याने साेमवारी केला हाेता. त्याला चाेवीस तास उलटण्याच्या आतच कृष्णा आंदेकर पाेलीसांना शरण आला आहे. Bandu Andekar

नाना पेठेतील टोळीयुद्धातून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याच्यावर गोळीबार करून पसार झालेल्या आंदेकर टोळीतील शिवम आंदेकरसह चौघांना गुजरात सीमेवरून अटक करण्यात आली. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याचा मुलगा कृष्णा आंदेकर अद्यापही पसार होता.



आज अखेर कृष्णा आंदेकर पोलिसांना शरण आला आहे. कृष्णा आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपींपैकी एक आहे. पोलिसांकडून कृष्णा आंदेकरला अटक करण्याचे प्रयत्न सुरू होते. गुजरात सीमेवरून शिवम उदयकांत आंदेकर (३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (२१), शिवराज उदयकांत आंदेकर (२९) आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (६०, सर्व रा. नाना पेठ) यांना अटक करण्यात आली होती. आज शरण आलेल्या कृष्णा आंदेकरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोमकर खून प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (७०), त्याचा नातू तुषार नीलंजय वाडेकर (२७), स्वराज नीलंजय वाडेकर (२३), मुलगी वृंदावनी नीलंजय वाडेकर (४०), अमन युसूफ पठाण (२५), यश सिद्धेश्वर पाटील (१९), अमित प्रकाश पाटोळे (१९, सर्व रा. नाना पेठ) आणि सुजल राहुलू मेरगु (२०, आंध्र झार आळी, भवानी पेठ) यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी आयुष कोमकर हा लहान भावाला क्लासवरून घेऊन साडेसातच्या सुमारास नाना पेठेतील हमाल तालमीजवळ असलेल्या सोसायटीत आला. तळमजल्यावर दुचाकी लावत असताना आयुषवर पिस्तुलातून बेछूट गोळीबार करून त्याचा खून करण्यात आला होता. याबाबत आयुषची आई कल्याणी (३७) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडू आंदेकरसह साथीदारांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली. आंदेकर टोळीतील पाच आरोपी पसार झाले होते. गुन्हे शाखेचे पथके त्यांच्या मागावर होती. कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ आराेपींविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या १३ जणांना अटकही करण्यात आली आहे.

Bandu Andekar’s son Krishna surrenders to the police due to fear of encounter!

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023