Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?

Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?

Dhananjay Munde

विशेष प्रतिनिधी

बीड: Dhananjay Munde बीडमध्ये बंजारा समाजाचं आंदोलन सुरु असतांना, या आंदोलनात धनंजय मुंडे देखील सामील झाले. या आंदोलनात भाषण करताना त्यांनी “बंजारा आणि वंजारी” एकच असल्याचं वक्तव्य केलं. त्यांच्या या व्यक्तव्यामुळे महाराष्ट्रात आता चांगलीच खळबळ माजली आहे.

मुंडेंच्या या वकव्याला कडाडून विरोध केला जात आहे. “आधी तुम्ही आमच्या ताटातलं अडीच टक्के आरक्षण घेतलंय. त्यामुळे तुमचं वंजारा-बंजारा एक आहे, हे शब्द मागे घ्या”, असं म्हणत मोर्चातील बंजारा तरुणांनी या व्यक्तव्याला जोरदार विरोध केला. या तरुणांचा व्हिडिओ आता सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे ओबिसींचा चेहरा बनू पाहणारे धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा टीकेचा सामना करावा लागत आहे. Dhananjay Munde



बंजारा आणि वंजारी समाज खरंच एक आहेत का?

बंजारा आणि वंजारी या दोन्ही समाजांच्या प्रथा परंपरा, राहणीमानाची पद्धत इतिहास आणि अगदी दैवत देखील वेगवेगळे आहेत. फार पूर्वीपासून बंजारा समाजाला गोर बंजारा किंवा लमाण म्हणून ओळखलं जातं. या समाजाचा इतिहास हा अगदी सिंधू संस्कृतीपर्यंत जोडला गेलाय. कारण सिंधू संस्कृतीच्या काळात हा समाज म्हणजे एक व्यापारी जमत म्हणून ओळखली जात होती. यातले लोकं आपल्या जनावरांच्या पाठीवर माल वाहतूक करायचे आणि विविध गावांमध्ये फिरून व्यापार करायचे.

यात ही लोकं फक्त व्यापारच नाही, तर लढाईला गेलेल्या सैन्याला रसद पुरवणे, सैनिकांना सहकार्य करणे यांसारखी महत्वाची कामं देखील करायचे. कालांतराने मुघल साम्राज्याच्या काळात हा बंजारा समाज महाराष्ट्रात आला आणि मराठा साम्राज्याला देखील रसद पुरवू लागला. त्या काळात या समाजातील लोकांनी विहिरी, तलावं, किल्ले आणि धर्मशाळा बांधल्याचा देखील इतिहास आहे. त्यामुळे भारतातील एक लढवय्या समाज म्हणून कधीकाळी बंजारा लोकांकडे बघितलं जायचं. Dhananjay Munde

मात्र इंग्रजांच्या काळात भारतात रेल्वे आली, अन् लोकं दळणवळणासाठी, व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. त्यामुळेच बंजारा समाजाचं महत्व कमी झालं. परिणामी याचा त्यांच्या व्यापारावर आणि कमाईवर चांगलाच परिणाम झाला. त्यामुळे हा समाज देशोधडीला लागला. पुढील काळात राज्यात गुन्हेगारी वाढू लागली. त्यात भर म्हणून इंग्रजांनी बंजारा समाजावर एक गुन्हेगारी समाज म्हणून शिक्का लावला. आता या समाजाच्या श्रद्धेचा विचार केला, तर पोहरादेवी हे बंजारा समाजासाठी सर्वात मोठं दैवत आहे. म्हणूनच पोहरादेवीला बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं जातं. तसंच सामाजिक – धार्मिक क्षेत्रातील समाज सुधारक क्रांतिसिंह सेवालाल महाराजांना देखील बंजारा लोकं दैवत मानतात.

बंजारा समाजाप्रमाणेच जर आपण वंजारी समाजाचा विचार केला. तर वंजारी समाज देखील पूर्वीपासून एक व्यापारी समाज म्हणून ओळखला जात होता. तसंच लढाऊ बाण्यासाठी देखील या समाजाला ओळखलं जात होतं. असं म्हणतात, की या समाजातले लोकं रेणुका माता आणि जमदग्नी ऋषीचे वंशज आहेत. मात्र कालांतराने हे लोकं राजस्थानमध्ये स्थायिक झाले, अन् पुढे देशभरात विखुरले गेले. यात जर अगदी महाराणा प्रताप यांच्या सैन्याचा विचार केला, तर भल्लसिंघ वंजारी आणि फत्तेसिंघ वंजारी हे त्यांचे सेनापती होते. जे मुळचे वंजारी समाजाचे होते. Dhananjay Munde

त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही कित्येक वंजारी बांधवांचा समावेश होता. तसंच या समाजाच्या श्रद्धास्थानांचा विचार केला, तर रेणुका देवी, ही प्रमुख्याने या समाजाची कुलदेवता आहे. या समाजाची नवनाथांवर आणि विशेष म्हणजे संत भगवान बाबांवर विशेष श्रद्धा आहे. त्यामुळेच जर बंजारा आणि वंजारी यांची तुलना केली. तर त्यांच्यात नावातील साधर्म्य सोडलं, तर कोणतीच बाब सारखी नाहीये. यांची आडनावं, पोटजाती, भाषा, संस्कृती, हे सगळंच वेगवेगळं आहे. Dhananjay Munde

As Dhananjay Munde said, are Banjara and Vanjari the same?

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023