विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बुधवारी एसटीची 10 टक्के भाडेवाढ रद्द करण्याची घोषणा केली. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईकांना ही भाडेवाढ मागे घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सरनाईकांनी लगेचच ही भाडेवाढ मागे घेण्याची घोषणा केली. Eknath Shinde
राज्य परिवहन महामंडळाने मंगळवारी दिवाळीच्या काळात म्हणजे 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीसाठी 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ सरसकट सर्वच बसेसना लागू नव्हती. त्यातून वातानुकूलित शिवनेरी व शिवाई बसेस वगळण्यात आल्या होत्या. यामुळे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या लालपरीसह लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी अनुकूल असणाऱ्या रातराणीच्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार होता. त्यामुळे ही दरवाढ मागे घेतली जावी अशी मागणी केली जात होती.
एसटीच्या दरवाढीवर सामान्य जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांना ही दरवाढ मागे घेण्याची सूचना केली. त्यानंतर परिवहन मंत्र्यांनी वेळ न दवडता लगेचच ही दरवाढ मागे घेण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा अतिवृष्टीने मेटाकुटीस आलेल्या सर्वसामान्यांसह दिवाळीला गावी जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
गेल्या वर्षी टॅक्सी व रिक्षा चालक संघटनांकडून भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून देण्यात आलेल्या भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे नव्या वर्षात एसटीचा प्रवास महागला होता. 24 जानेवारी 2025 पासून एसटीची भाडेवाढ लागू करण्यात आली होती. त्यावेळी झालेल्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या (एसटीए) बैठकीत 14.95 टक्के तिकीट दरवाढीला मान्यता दिली होती. तशी औपचारिक घोषणाही करण्यात आली होती.
दिवाळीच्या काळात एसटी महामंडळाची अग्निपरीक्षा असते. कारण, या काळात राज्यभरातील चाकरमानी आपापल्या गावी जातात. सुट्ट्या असल्यामुळे बसस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. एसटीला चांगला महसूल मिळतो. त्यामुळे सणावाराच्या दिवसांत प्रवाशांचा वाढणारा ओघ व त्यातून मिळणारा महसूल लक्षात घेता एसटीतर्फे दरवर्षी दिवाळीच्या काळात काही टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो.
ST’s 10 percent fare hike canceled after Eknath Shinde’s order
महत्वाच्या बातम्या
- Dhananjay Munde : मुंडे म्हणाले तसं, बंजारा आणि वंजारी एकच आहेत का?
- Jan Arogya Yojana : जनआरोग्य योजनेत आता २,३९९ आजारांवर उपचार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- Nana Patole : महाराष्ट्र कर्जबाजारी, सरकारने श्वेतपत्रिका काढण्याची नाना पटाेले यांची मागणी
- एनकाउन्टरच्या भीतीने बंडू आंदेकरचा मुलगा कृष्णा पाेलीसांना शरण!