विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्यावर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आता या प्रकरणात स्वतः आमदार पठारे यांच्यासह एकूण 8 जणांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा विमानतळ पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. Bapusaheb Pathare
ही फिर्याद बंडू शहाजी खांदवे (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट, रा. लोहगाव) यांनी दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात आमदार बापूसाहेब पठारे यांच्यासह शकील शेख, महेंद्र पठारे, सुरेंद्र पठारे, रविंद्र पठारे, किरण पठारे, सागर पठारे, सचिन पठारे आणि रुपेश मोरे या आठ जणांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत.
अलीकडेच लोहगाव येथे झालेल्या कार्यक्रमादरम्यान आमदार पठारे यांना काही लोकांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या तणावपूर्ण वातावरणानंतर आता या घटनेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याने प्रकरणाला नवे राजकीय वळण लागले आहे.
या संपूर्ण घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील अंतर्गत संघर्ष उघडकीस येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून संबंधित आरोपींविरोधात पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
A case of forced theft has been registered against MLA Bapusaheb Pathare.
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा