विशेष प्रतिनिधी
बुलडाणा: समाजा-समाजात आज दुही, विसंवाद आणि संघर्ष निर्माण झाला आहे. त्या पापाचे धनी शरद पवारच आहेत, असा जोरदार हल्लाबोल भाजप नेते व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांवर केला आहे.
बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, 1994 साली जर शरद पवारांनी मराठा समाजाचा समावेश केला असता, तर आजची परिस्थिती नसती. सध्या हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम सुरू आहे.
मात्र, मला ओबीसी बांधवांना हा प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला आरक्षण देताना मराठा बांधवांनी कधी विरोध केला होता का? 1994 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी हे पाप करून ठेवले आहे. त्याचवेळी जर मराठा समाजाचा समावेश केला असता तर आज समाजात दुही, विसंवाद व संघर्ष राहिला नसता. या पापाचे धनी कोण? या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी शरद पवार साहेबांना विचारायला हवे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. संजय राऊत हा बांग देणारा कोंबडा आहे. त्यांच्या पक्षाने त्यांना दररोज सकाळी बांग देण्यासाठी ठेवले आहे. सामना हा पेपर फार जास्त लोक वाचत नाहीत. त्यामुळे सामना काय म्हणतो याला महत्त्व नाही. सरकारने शेतकऱ्यांना भरीव पॅकेज दिले आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळच्या भावाला सचिन घायवळला शस्त्र परवाना दिल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावर विखे पाटील म्हणाले, सचिन घायवळ हा काय व्यक्ती आहे, तुम्हाला माहीत नाही. जर पोलिसांनी त्याची शिफारस केली असेल किंवा नसेल. या परिस्थितीवर गृहराज्य मंत्र्यांनी खुलासा केला आहे. विरोधकांचे काम एकच आहे, फक्त काही झाले तर राजीनामा मागणे.
Sharad Pawar is the mastermind behind the sin of conflict, discord and conflict in society, says Radhakrishna Vikhe Patil
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा