विशेष प्रतिनिधी
नागपूर : Vijay Wadettiwar आम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु ओबीसींच्या हक्कांवर कुणाचीही गदा येऊ देणार नाही, असा निर्धार काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.Vijay Wadettiwar
नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या मोर्चात विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून हजारो ओबीसी बांधव, समाजनेते आणि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व वडेट्टीवार यांनी केले.Vijay Wadettiwar
मराठा आरक्षणासंदर्भातील 2 सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. मोर्चेकऱ्यांनी आरोप केला की, सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर थेट अतिक्रमण होत आहे. त्यामुळे हा जीआर रद्द करून ओबीसींचा आरक्षण हक्क कायम ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनामुळे राज्यातील ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षण संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ओबीसी समाजाच्या नेत्यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या 2 सप्टेंबरच्या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे ओबीसींच्या शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षणावर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले की, आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, पण ओबीसी समाजाच्या हक्कांवर कुणी गदा आणू नये. सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र मार्ग शोधावा, मात्र विद्यमान जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याने तो त्वरित मागे घ्यावा.
Vijay Wadettiwar’s determination at the march in Nagpur: No one will be allowed to interfere with the rights of OBCs
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा