विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुस्लिम समाजाविषयी सतत वादग्रस्त विधाने करत असल्याने आमदार संग्राम जगताप यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकदा समज दिली. मात्र तरीही संग्राम जगताप ऐकत नसल्याने पक्षाकडून त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांनी त्याबाबत संकेतही दिले आहेत. Sangram Jagtap
दिपावली सणा निमित्त प्रत्येक नागरिकाने खरेदी केवळ हिंदूच्याच दुकानातून करावी आवाहन संग्राम जगताप यांनी केले होते. त्यावरून अजित पवार गटात अस्वस्थता आहे. पक्षाच्या सर्वसमावेशक भूमिकेला यामुळे तडा जात असल्याचे म्हटले जात आहे. याची दखल अजित पवार यांनीही घेतली आहे.
अजित पवार म्हणाले, अरुणकाका जगताप जोपर्यंत हयात होते. तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं. परंतु आता काही लोकांना आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या वडिलांचे छत्र हरवले आहे. त्यावेळेस आपण जबाबदारीने वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा ही त्याला समजावून सांगितलं होतं. तो म्हणाला होता की, मी त्यात सुधारणा करेल. पण ते सुधारणा करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्याची जी भूमिका आहे. त्याचे जे विचार आहेत. ते पक्षाला अजिबात मान्य नाहीत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल.”
अहिल्यानगर शहर गेल्या काही दिवसांपासून धार्मिक ध्रुवीकरणाचे केंद्र ठरत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वीपासून औरंगजेब फॅन क्लबने तिथे खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर हिंदू-मुस्लीम तणाव उफाळून आला होता. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची गुरुवारी जाहीर सभा झाली. त्यात माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांच्याविरोधात टीकेची झोड उठवली. करमाळा येथील हिंदू जन आक्रोश मोर्चात संग्राम जगताप यांनी दिवाळीची खरेदी हिंदूकडून करण्याचे आवाहन केले होते. दिपावली सणा निमित्त प्रत्येक नागरिकाने खरेदी केवळ हिंदूच्याच दुकानातून करावी असे आवाहन केले होते.
MLA Sangram Jagtap Defies Party Line, Ajit Pawar to Take Action
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना