विशेष प्रतिनिधी
पुणे : कुख्यात गँगस्टर निलेश घायवळलाग पासपोर्ट महाविकास आघाडी सरकारच्या काळात मिळाला आहे. त्यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे गृहमंत्री कोण होते? कोणी त्याला पासपोर्ट मिळवून देण्यास मदत केली असा सवाल करत चौकशीची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे.
आमदार शिरोळे म्हणाले, निलेश घायवळ हा परदेशात पळून गेला आहे. त्याने पासपोर्ट कसा घेतला त्याबाबत धक्कादायक माहिती पासपोर्ट घेतला आहे. घायवळ हा अहिल्यानगरमधील सोनेगावचा राहिवासी आहे. त्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार होते. त्याच्या पोलीस व्हेरिफिकेश रिपोर्टमध्ये एकही गुन्हा दाखल नाही. त्याने जो पत्ता नोंदवला तो बनावट आहेहा रिपोर्ट तयार करण्यात आला तो कुणाच्या दबावाखाली करण्यात आला आहे.त्यावेळी जामखेडचे तात्कालीन आमदार कोण होते आणि. गृहमंत्री कोण होते?याची सखोल चौकशी करण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करतोय.
आमदार चिरोली म्हणाले घायवळ प्रकरणात सर्व खोटं रंगवलं जात आहे. यामध्ये अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी. कोणाच्या तरी दबावाखाली हे सर्व सुरु आहे.
दरम्यान, निलेश घायवळ याच्या गँगमधील गुंडांनी कोथरूड येथे गोळीबार केल्यावर घायवळ गँगवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यानंतर निलेश घायवळ लंडनला पळून गेला. पोलिसांनी त्याच्यावर मोका कारवाई केली आहे.
MLA Siddharth Shirole targets Rohit Pawar in Nilesh Ghaywal passport case
महत्वाच्या बातम्या
- Cooperation Minister, : लोकांना कर्जमाफीचा नाद, सहकार मंत्र्यांच्या असंवेदनशील विधानावर संताप, म्हणण्याचा अर्थ ताे नव्हता असा खुलासा
- Nitesh Rane : एमआयएमच्या नावाखाली हिरव्या सापांची वळवळ, पुन्हा सभा हाेऊ द्यायची का विचार करू, नितेश राणेंचा इशारा
- Ajit Pawar : तुम्हाला पाठीशी घालायला आम्ही मोकळे नाही, गैरप्रकार करणाऱ्यांना अजित पवार यांचा इशारा
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन निवडणुकीत रंगणार ‘पवार विरुद्ध मोहोळ’ सामना