विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण लक्षात घ्या 50 हजार हेक्टरी आपण कुणाकडे मागत आहोत. ज्यांनी 50 खोके घेतले त्यांच्याकडे मागत आहोत. हे लोक असे-तसे वठणीवर येणार नाहीत. तुम्ही मला जो चाबूक दिला आहे, तो चालवावा लागेल. त्यानंतर हे लोक वठणीवर येतील, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हंबरडा मोर्चा’ काढण्यात आला आहे. र क्रांती चौक ते गुलमंडी असा मोर्चा ठाकरे गटाने काढला आहे. या मोर्चात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकरी सहभागी झाले होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, 15 दिवसांपूर्वी मी मराठवाड्यात आलो होतो. तेव्हा पाच सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेटलो होतो आणि तेव्हाच जाहीर केलं होतं की, जोपर्यंत हे सरकार कर्जमुक्ती करत नाही, तोपर्यंत सरकारला सोडत नाही. पण गेल्यावेळी पाऊस होता आणि आता कडक ऊन आहे. आम्ही शहरी बाबू असल्याने लोकं विचारतात हे तिकडे जाऊन काय करणार? पण मधल्या काळात दोन गोष्टी केल्या. परंपरेप्रमाणे दसरा मेळावा घेतला. पाऊस पडत असताना चिखलात दसरा मेळावा घेतला. पण आज तर कडक ऊन आहे. मेळाव्याच्या वेळी सत्ताधाऱ्यांनी विचारलं लोकं चिखलात कसे बसणार? पण शेतकरी ऊन, वारा आणि पावसात अन्न-धान्य पिकवतो. त्यांचं आयुष्य चिखलात असतं. मग आपण साधी सभा घेऊ शकत नाही का? त्यामुळे बोलणाऱ्यांना बोलू द्या. तुमच्या प्रत्येक संकटावेळी शिवसेना तुमच्यासोबत राहील.
50 हजार हेक्टरीच्या मागणीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 50 हजार पर हेक्टर एवढे पैसे मी मागितले. पण हे पैसे मागायला मला काही स्वप्न पडलं नाही. शेतकऱ्यांना विचारून सांगितलं होतं. मी शेतकऱ्यांना विचारलं तुमची कितीची अपेक्षा आहे. शेतकरी म्हणाले, 50 हजार पाहिजे आणि कर्जमुक्ती पाहिजे. म्हणून मी मागणी केली. परंतु याठिकाणी पॅकेज जाहीर केल्यानंतर पोस्टर लागले आहेत. पण त्यावर शेतकऱ्यांचा फोटो नाही.
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31 हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं आहे. इतिहासातील सर्वात मोठं पॅकेज आहे, असे ते म्हणतात. पण हे सर्वात मोठं पॅकेज नाही, तर इतिहासातील सर्वात मोठी थाप आहे. आजपर्यंत कोणी अशी थाप मारली नव्हती. इतिहासातील पहिली मोठी थाप फडणवीस सरकारने केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, कळवळा आला असता तर नरेंद्र मोदी नुकतेच महाराष्ट्रात येऊन गेले. त्यांटी दोन-तीन भाषणे झाली, पण त्यात शेतकऱ्यांबद्दल उल्लेख नव्हता. ज्या पंतप्रधानांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती माहीत नाही. त्यांच्याकडे काय न्याय मागायचा?
सत्तेत एक फूल आणि दोन हाफ बसले आहेत, असे म्हणत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
Uddhav Thackeray Slams Those Who Took 50 Crores, Said Demanding ₹50,000 for farmers
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा