विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महागठबंधनमध्ये तणाव वाढला आहे. जागावाटपावरून निर्माण झालेल्या वादामुळे काँग्रेस व राष्ट्रीय जनता दल (RJD) यांच्यात मतभेद उघड झाले आहेत. काँग्रेसच्या दलित नेत्याविरुद्ध राष्ट्रीय जनता दलाने एका बाहुबली नेत्याच्या लंडन रिटर्न मुलीला उमेदवारी दिली आहे.काँग्रेस समर्थक खासदार राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी आरजेडीवर तीव्र टीका करत “दलितांचा आणि राहुल गांधींच्या विचारांचा अपमान” केल्याचा आरोप केला आहे. Rashtriya Janata Dal
१६ ऑक्टोबर रोजी काँग्रेसने बिहार निवडणुकांसाठी ४८ उमेदवारांची यादी जाहीर केली होती. यात लालगंज मतदारसंघातून आदित्यकुमार राजा यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे १७ ऑक्टोबरला आरजेडीने त्याच मतदारसंघातून शिवानी शुक्ला यांना उमेदवारी दिली. शिवानी या जेलमध्ये असलेल्या बाहुबली नेते विजयकुमार शुक्ला उर्फ मुन्ना शुक्ला यांच्या कन्या आहेत.
मुन्ना शुक्ला यांच्यावर खूनासह तब्बल २४ गुन्ह्यांचे आरोप असून ते सध्या जन्मठेप भोगत आहेत. त्यांनी २००० मध्ये जेलमधून स्वतंत्र उमेदवार म्हणून पहिली निवडणूक जिंकली होती. नंतर त्यांनी लोकजनशक्ती पार्टी आणि जनता दल (युनायटेड) या पक्षांतून देखील विजय मिळवला होता. २००५ मध्ये विजयी झाल्यानंतर बृज बिहारी प्रसाद खून प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांना निवडणुका लढवण्यास बंदी घालण्यात आली होती. २०१४ मध्ये निर्दोष सुटले असले तरी २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना पुन्हा दोषी ठरवले.
शिवानी शुक्ला या लंडनमध्ये शिक्षण घेतलेल्या असून कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, मात्र त्यांच्या वडिलांच्या पार्श्वभूमीमुळे आरजेडीवर टीका होत आहे. पप्पू यादव यांनी आरजेडीवर टीका करत म्हटले, “लालगंज हा अत्यंत मागास मतदारसंघ आहे. आम्ही इथे दलित उमेदवार उभा केला आहे, पण आरजेडी बाहुबलींच्या मुलींना संधी देते. हे दलितांचा आणि आमच्या पक्षाध्यक्षांचा अपमान आहे.”
पुढे बोलताना त्यांनी आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांना आवाहन केले की, “गठबंधनधर्म पाळावा आणि काँग्रेसने ज्या जागांवर उमेदवार उभे केले आहेत, तिथून आपले उमेदवार मागे घ्यावेत.”
पप्पू यादव यांनी स्पष्ट केले की, “राहुल गांधींनी देखील सर्व पक्षांना इंडिया आघाडीच्या हितासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले आहे. आम्ही जिथे आरजेडीचा उमेदवार आहे, तिथे आमचा उमेदवार दिला नाही. त्यामुळे आरजेडीने देखील तशीच भूमिका घ्यावी. जनतेला INDIA आघाडीबद्दल विश्वास आहे, परंतु अंतर्गत संघर्ष आघाडीचे नुकसान करेल.”
Rashtriya Janata Dal has fielded the London-returned daughter
महत्वाच्या बातम्या
- Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल
- Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन
- बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा