ATS Raids : महाराष्ट्र एटीएसची मुंब्रा परिसरात छापेमारी, दोन संशयित व्यक्तींची कसून चौकशी

ATS Raids : महाराष्ट्र एटीएसची मुंब्रा परिसरात छापेमारी, दोन संशयित व्यक्तींची कसून चौकशी

ATS Raids

विशेष प्रतिनिधी

मुंबई : ATS Raids नवी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातील तपास कारवायांना वेग आला आहे. या स्फोटात 12 जणांचा बळी गेला होता आणि या प्रकरATS Raids

नवी दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर देशभरात छापेमारी सुरू असून महाराष्ट्रातील तपास कारवायांना वेग आला आहे. या स्फोटात 12 जणांचा बळी गेला होता आणि या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. याच संदर्भात महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने मुंब्रा परिसरात छापेमारी करून दोन संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू केली आहे.ATS Raids



एटीएसने या दोन व्यक्तींकडून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त केल्या असून त्यांचे विश्लेषण केले जाणार आहे. दिल्ली बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या घटनेनंतर दिवसभर देशातील विविध भागांत कारवाई करण्यात आली असून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अल-कायदा या दहशतवादी संघटनेचे साहित्य बाळगल्याच्या आरोपावरून पुण्यातून एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. याच अनुषंगाने एटीएसने आता मुंबईजवळील मुंब्रा भागात छापेमारी केली आहे.

अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट’ या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादचा प्रसार-प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याचा आरोप जुबेर इलियास हंगरगेकर याच्यावर आहे. हंगरगेकर याच्या अटकेनंतर या संपूर्ण नेटवर्कचा तपास करण्यासाठी एटीएसने मुंब्रा येथे धाड टाकून कारवाई केली आहे सोमवारी संध्याकाळी 6:52 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशन पार्किंग लॉटजवळ हा स्फोट झाला. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 20 हून अधिक जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. उर्वरितांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवली जाईल.

मंगळवारी संध्याकाळपर्यंत, फॉरेन्सिक टीमने स्फोटस्थळावरून 42 पुरावे गोळा केले. यामध्ये i20 कार (ज्यामध्ये स्फोट झाला), तिचे भाग, टायर, चेसिस, सीएनजी सिलेंडर, बोनेटचे भाग आणि इतर भाग समाविष्ट आहेत. या पुराव्यांची तपासणी बुधवारी सुरू होईल.

Maharashtra ATS Raids Mumbra Area, Detains Two Suspects for Intense Interrogation

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023