काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी

काेरेगाव पार्क जमीन प्रकरणी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा, अंजली दमानिया यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अमेडिया कंपनी ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म आहे. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट कायद्यातील कलम 38 नुसार पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने व्यवहार केला असेल, तर कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीअजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामानिया यांनी केली आहे.

पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन खरेदी व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार अडचणीत सापडले आहेत. अजित पवार यांनी हा व्यवहार रद्द झाल्याची माहिती दिली असतली तरी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांनी मंगळवारी (11 नोव्हेंबर) मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर आज (12 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत पार्थ पवार जमीन व्यवहाराचा करार कायद्याने रद्द करता येणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, पुण्यातील जमीन व्यवहाराची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीत सहापैकी पाच सदस्य हे पुण्यातील आहेत. त्यामुळे पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असताना ही समिती निष्पक्ष चाैकशी करू शकेल का? यामुळेच माझी पहिली मागणी आहे की, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा.

अंजली दमानिया म्हणाल्या की, कोरेगाव पार्कमधील 1804 कोटींची जमीन व्यवहार करून 300 कोटींना घेण्यात आली. तसेच त्यावर स्पॅम्प ड्युटी भरली नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे माझा दुसरा प्रश्न आहे की, तिथे असणाऱ्या गायकवाड कुटुंबाला महार वतनाची जमीन मिळाली आणि नंतर ती खालसा झाली. जमीन खालसा झाल्यानंतर गायकवाड कुटुंबीयांना ती जमीन परत कधीही दिली गेली नाही. असे असताना पॉवर ऑफ अटोर्नी देऊन कोरेगाव पार्कमधील जमीनीचा व्यवहार कसा करू शकतात? असा प्रश्न दमानिया यांनी विचारला आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, व्यवहार झालेली जमीन गायकवाड कुटुंबीयांच्या नावावर होणे अपेक्षित होते. त्यानंतरच पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला हा व्यवहार करता आला असता. पण शीतल तेजवानीने 11 हजार रुपये 30 डिसेंबर 2023 रोजी भरले. त्याचे पत्र 30 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या व्यवहार प्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी दमानिया यांनी केली.

अजित पवार यांनी जमीन व्यवहार रद्द केल्याची माहिती दिली आहे. यासंदर्भात बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, कुठलाही व्यवहार रद्द करताना विक्री आणि घेणारा तो व्यवहार रद्द करू शकतो. परंतु या जमिनीची पॉवर ऑफ अटोर्नी नोंदणीकृत नाही. विक्रीचा व्यवहारात पॉवर ऑफ अटोर्नी नोंदणीकृत असणे आवश्यक असते, असे कायदा सांगतो. शीतल तेजवानीला गायकवाड कुटुंबाकडून खरेदी किंवा विक्रीचे अधिकार नाहीत. तसेच जमीन खरेदीचा करार पार्थ पवार किंवा शीतल तेजवानी रद्द करू शकत नाहीत. जमीनीचा व्यवहार कायद्याने रद्द करता येणार नाही. व्यवहार रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावेच लागेल, असा दावा दमानिया यांनी केला.

आतापर्यंत पार्थ पवारांना वगळत तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याचपार्श्वभूमीवर अंजली दमानिया म्हणाल्या की खरेदीखत करताना जर खोट्या व्यक्ती उभ्या केल्या, तर अशा व्यक्तींना कायद्याने शिक्षा होऊ शकते. सात वर्षे शिक्षा आणि दंड अथवा दंड आणि शिक्षा अशा दोन्हींची कायद्यात तरतूद आहे. परंतु जो गुन्हा दाखल झाला आहे, त्यात अमेडिया कंपनीचे आणि पार्थ पवार यांचे नाव नाही. तसेच महसूल मंत्री बावनकुळे म्हणतात की, ज्यांनी खरेदीखतावर स्वाक्षरी केली आहे, त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पण अमेडिया कंपनी ही लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप फर्म आहे. लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिप ॲक्ट 2008 हा जो कायदा आहे. या कायद्यातील कलम 38 नुसार, लिमिटेड लायबलिटीज पार्टनरशिपने जर फसवण्याच्या हेतूने असा व्यवहार केला असेल, तर मग त्यात कायदेशीर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यावरही ताबडतोब गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.

Anjali Damania demands that a case be registered against Parth Pawar in the Koregaon Park land case.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023