विशेष प्रतिनिधी
नागपूर : तुळजापूर ड्रग प्रकरणातील आरोपींना भाजप प्रवेश देण्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा सवाल केला आहे. Nana Patole
सत्ताधारी भाजप माफिया वृत्तीच्या लोकांसाठी सत्तेचा मार्ग प्रशस्त करत असल्याची टीका काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. भाजपचे बोलायचे व खायचे दात वेगळे आहेत, हे आता लोकांना कळले आहे. त्यामुळेच आज महाराष्ट्रात कुठे नेऊन ठेवला आमचा महाराष्ट्र असे मत तयार होत आहे, असे ते म्हणाले.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे राज्याचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधून हा सत्ताधारी भगवा पक्ष माफिया वृत्तीच्या लोकांना सत्तेचा मार्ग प्रशस्त करत असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, भाजपने मागे नाशिक येथील एका माफियावर विधानसभेत आरोप केले होते. पण त्यानंतर त्यालाच आपल्या पक्षात घेतले. भाजप स्वतःला पार्टी विथ द डिफरन्स अशी उपाधी देतो. पण आता त्यांचेच लोक आता आपल्या पक्षात भ्रष्ट लोकांना वॉशिंग मशिनमध्ये धुवून स्वच्छ करण्यात येत असल्याची विधाने करत आहेत.
भाजपचे सांगायचे व खायचे दात वेगळे आहेत हे लोकांना आता कळले आहे. यामुळेच भाजप कोणत्याही जिल्ह्यातील माफिया वृत्तीच्या लोकांना पक्षात घेऊन त्यांना सत्तेचा मार्ग देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला अशा पद्धतीचे मत तयार होत आहे. पत्रकार मंडळीही याविषयी आता उघडपणे बोलत आहे. भाजप सध्या अत्यंत खालच्या पातळीवरचे राजकारण करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.
नाना पटोलेंनी नुकतेच शरद पवारांवर काँग्रेस तोडण्याचे आरोप केले होते. ते पार्थ पवार प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले होते, भाजप व आमच्या मित्रपक्षांनी काँग्रेसला कमकुवत करण्याचा कट रचला आहे. हे काही आता गुपित राहिले नाही. त्यांचा डाव आमचा पक्ष नष्ट करण्याचा आहे. पण ते त्यात कधीही यशस्वी होणार नाहीत. 2029 मध्ये कसे जिंकायचे हे आम्हाला माहिती आहे. आम्ही यापुढेही भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत राहू. मुख्यमंत्र्यांनी पुणे भूखंड घोटाळा अत्यंत गंभीर प्रकरण असल्याचे म्हटले आहे. हे प्रकरण खरेच गंभीर असेल तर सरकार स्वतः त्याची चौकशी कशी काय करू शकते?
सकारने आपल्याच विभागाच्या एका अधिकाऱ्याकडे या चौकशीचे नेतृ्त्व सोपवले आहे. सरकारमध्ये हिंमत असेल तर तुकाराम मुंढे सारख्या अधिकाऱ्याच्या हातात या चौकशीची सूत्रे द्यावीत. भाजप मोठ्या प्रमाणात जमिनी हडप करणाऱ्यांना संरक्षण देत आहे. त्यामुळे त्याला नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा कोणताही अधिकार नाही, असे ते म्हणाले होते.
Where has our Maharashtra taken us, Nana Patole questions on the entry of drug case accused into BJP
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















