विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Shiv Sena शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या सुनावणी पुढील वर्षी जानेवारीमध्ये ठेवली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच आमदार अपात्रतेची सुनावणी होण्याची शक्यता आहे.Shiv Sena
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला पक्षनाव आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र याप्रकरणी न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे हाेणाऱ्या सुनावणीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.Shiv Sena
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण चिन्हाचा वापर करण्यापासून रोखा, अशी मागणी ठाकरे गटाने जुलैमध्ये अंतरिम अर्जाद्वारे केली होती. या अर्जाची दखल घेत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मूळ याचिकाही निकाली काढण्याचे संकेत दिले होते. याआधी या प्रकरणावर 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती. परंतु, राज्यांच्या विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपती व राज्यपालांना वेळमर्यादा असावी का? यावर राष्ट्रपतींनी मागितलेल्या सल्ल्यावर उत्तर देण्यासाठी स्थापन खंडपीठात न्यायाधीश सूर्यकांत यांचा समावेश झाल्याने ही सुनावणी लांबणीवर पडली होती.
शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी 8 ऑक्टोबला अपेक्षित होती, मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी आजची तारीख दिली होती. न्यायाधीश सूर्यकांत यांच्या बेंचसमोर आज शिवसेना आणि राष्ट्रवादीची एकत्रित सुनावणी 19 क्रमांकावर सुनावणी लागली होती. मात्र न्यायाधीश सूर्यकांत यांनी पुन्हा एकदा पुढील तारीख दिली आहे. आता दोन्ही पक्षाच्या आमदार अपात्रतेची सुनावणी 21 जानेवारी 2026 ला होणार आहे.
आजच्या सुनावणीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, आमदार अपात्रतेचे प्रकरण अत्यंत गंभीर असून न्यायालयाने यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला हवी होती. युक्तीवादासाठी आमच्या दोन तास लागतील, असे आम्ही न्यायालयाला सांगितले होते. परंतू न्यायाधीश सूर्यकांत यांनी 21 जानेवारीची तारीख दिली आहे आणि ती आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती, असे म्हणत अनिल देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.
Hearing on disqualification of Shiv Sena, NCP MLAs to be held in January next year
महत्वाच्या बातम्या
- हत्येच्या कटातील आराेपी जरांगेचेच कार्यकर्ते, धनंजय मुंडे यांचा खळबळजनक आराेप
- Ambadas Danve : मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला…! अंबादास दानवे यांचा अजित पवारांवर निशाणा
- राजद म्हणजे खंडणी, घराणेशाही आणि घोटाळा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
- स्लीपर वंदे भारत ट्रेन धावली ताशी १८० किमी वेगाने, डेस्कवरचे पाणीही नाही सांडले



















