विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील नौगाम पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात 9 जण ठार झाले असून 29 जखमी झाले आहेत. जप्त करून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा भीषण स्फोट झाला. जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे.
बहुतांश पोलीस आणि जप्त केलेले स्फोटक पदार्थ तपासणारे फॉरेन्सिक तज्ज्ञांचा मृत्यू झाला आहे.
स्फोटानंतर पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लागली त्यामुळे परिसरात धुराचे मोठे लोट उठले होते
रात्री उशिरा हा स्फोट त्यावेळी झाला जेव्हा तपासणी पथक नुकत्याच उघडकीस आलेल्या ‘व्हाईट-कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित स्फोटकांच्या मोठ्या साठ्याचे नमुने गोळा करत होते. हा स्फोट कशामुळे झाला यासंर्भात पोलिसांकडून स्फोटाच्या दोन शक्यता तपासल्या जात आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “न्यायदंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अमोनियम नायट्रेट सील करत असताना अपघाताने स्फोट होण्याची एक शक्यता आहे. तपास यंत्रणांकडून हा हल्ला दहशतवादी आहे का हे देखील तपासले जात आहे.
या पोलीस ठाण्यात दहशतवादी मॉड्यूलप्रकरणी मूळ एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यात सुमारे 350 किलो जप्त केलेले स्फोटक रासायनिक पदार्थ साठवलेले होते. काही रसायने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती, परंतु बहुतांश साठा इमारतीतच होता. तपासणी पथक पोलीस ठाण्याच्या आवारात जप्त केलेल्या एका गाडीमध्ये आयईडी (IED) पेरला होता का, या दिशेनेही तपास करत आहे.
जखमींना भारतीय लष्कराच्या रुग्णालयातदाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने परिसर सील केला आहे. दिल्लीत चार दिवसांपूर्वी कार स्फोट झाला होता हा स्फोट दहशतवादी कृत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.सुरक्षा दलांनी स्निफर डॉग्सच्या मदतीने संपूर्ण परिसराची तपासणी केली आहे. अटक करण्यात आलेल्या डॉ. मुझम्मिल शकील गनई याच्या भाड्याच्या फरिदाबाद येथील निवासस्थानातून 350 किलो स्फोटक रसायने जप्त करण्यात आली होती.
Nine policemen and a forensic expert killed in Nowgam police station in Srinagar
महत्वाच्या बातम्या
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर