Serve Mumbai : परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक, भाजपने ठाकरे बंधूंना ललकारले

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Serve Mumbai  बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएने एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर ताबडतोप भाजपने मुंबई महापालिकेच्या प्रचारास सुरुवात केली आहे. ठाकरे बंधूच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रमुख प्रतिस्पर्धी असणार हे लक्षात घेऊन त्यांनाच ललकारले आहे.Serve Mumbai

भाजपने मुंबईत प्रचाराला सुरुवात करताना दादर परिसरात काही बॅनर लावले आहेत. यात ‘परिवाराचा नाही तर मुंबईचा सेवक तोच नगरसेवक’ असे लिहिले आहे. हिंदी सक्तीविरोधात दोन्ही एकत्र आल्यानंतर त्यांच्यात भेटीगाठी वाढून राजकीय एकी होण्याची शक्यता आहे. ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईतील राजकीय चित्र बदलेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजपने प्रचारात पहिले लक्ष्य ठाकरे बंधूंना केले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक असे बॅनर लागले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने हे बॅनर लावले आहेत.Serve Mumbai

भाजप परिवाराला प्राधान्य देत नाही, असे म्हणत मुंबईचा नगरसेवक मुंबईकरच होईल, कुठल्या परिवाराचा होणार नाही, अशी प्रतिक्रिया यावर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे. काही दिवसांपासून मुंबईचा महापौर कोण होणार, याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. तर या बॅनरमधून ठाकरे परिवाराचा नाही म्हणजेच ठाकरे गट आणि मनसेचा नाही तर भाजपचा महापौर होईल, असे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे आजच (15 नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचा महापौर भाजपचाच होईल, असे म्हटले आहे. त्यामुळे भाजपची मिशन मुंबई सुरू झाली असून निशाण्यावर ठाकरे बंधू असतील, हेही स्पष्ट झाले आहे.

Serve Mumbai, Not Your Family, BJP Tells Thackeray Brothers

महत्वाच्या बातम्या