विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल ‘स्टार स्ट्रॅटेजिस्ट’ समजले जाणाऱ्या प्रशांत किशोर आणि त्यांच्या जन सुराज पार्टीसाठी जबरदस्त धक्का ठरले. २४३ पैकी तब्बल २३९ जागांवर लढवूनही पक्षाला एकही जागा मिळाली नाही. राज्यभरात केवळ ३ टक्के मते मिळाली. एका उमेदवाराने दुसरा क्रमांक मिळवला, ११५ उमेदवार तिसऱ्या स्थानी तर १२२ उमेदवार तिसऱ्यापेक्षाही खालच्या स्थानावर राहिले. Prashant Kishor
दोन वर्षांचा दौरा, सततची मीडिया दखल, मुलाखती, पॅनल चर्चा, पॉडकास्ट, सोशल मीडिया क्लिप्स, सततचा ‘किंगमेकर’ प्रतिमा– या सगळ्या गाजावाजा असूनही जमीन पातळीवर मतदारांनी जन सुराजला पसंती दिली नाही. पक्षाला नोटापेक्षा थोडे जास्त म्हणजे १.८ टक्के मते मिळाली.
राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता की किशोर किमान इतर पक्षांचे मत कापतील, पण तेही झाले नाही. निकालांनी एक गोष्ट साफ केली, मीडिया प्रसिद्धी आणि खरी जनाधार क्षमता यात मोठा फरक आहे.काही महिन्यांपासून टीवी चॅनेल्स, यूट्यूबर्स, पॉडकास्ट आणि राजकीय पॅनेल्सवर प्रशांत किशोर यांचा ‘किंगमेकर’ म्हणून जो धुमाकूळ दिसत होता, तो प्रत्यक्ष मतदानात अजिबात उमटला नाही. मुलाखतीतील लोकप्रियता आणि मतदारांची पसंती या दोन भिन्न गोष्टी असल्याचे निकालांनी दाखवून दिले.जन सुराजची हवा मुख्यत्वे सोशल मीडिया, चर्चासत्रे आणि किशोर यांच्या भाषणांपुरती मर्यादित राहिली. जमिनीवर ही ‘हाइप’ वास्तवात उतरलीच नाही.
जन सुराज समर्थकांनी हा पहिला प्रयत्न असल्याचे सांगून पराभव झाकण्याचा प्रयत्न केला तर तोही यावेळी फोल ठरतो. कारण प्रशांत किशोर हे नवखे राजकारणी नाहीत. दशकभराहून अधिक काळ देशातील मोठ्या नेत्यांना विजय मिळवून देण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. २०१२ मध्ये नरेंद्र मोदींच्या गुजरात मोहिमेत काम. २०१४ च्या भाजपच्या लोकसभा विजयानंतर देशभर नाव. बिहार महागठबंधनच्या २०१५ च्या विजयानंतर राष्ट्रीय ओळख. पंजाब, आंध्र, तामिळनाडू आणि बंगालमध्ये मोठे विजय घडवून आणले. २०१८ मध्ये JDU मध्ये प्रवेश, राष्ट्रीय उपाध्यक्षपद, निवडणूक यशात थेट भूमिकाअशा व्यक्तीला मतदारांनी ‘डेब्यू’ उमेदवार म्हणून अजिबात पाहिले नाही. उलट, आधीच अनुभवी असूनही मतदारांना त्यांचे भाषण आणि प्रत्यक्ष कामात दरी जाणवली.
A lot of buzz in the media but no pumpkin in hand, a huge blow to Prashant Kishor’s Jan Suraj Party
महत्वाच्या बातम्या
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर
- विराेधकांचा निवडणूक आयाेगाच्या नावाने शिमगा सुरू..संजय राऊत, राेहित पवारांचे मतचाेरीचे आराेप
- ताडाेबातील वाघ सह्याद्रीच्या घाटावर, तीन नर आणि पाच मादी वाघांचे स्थानांतर