Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांनी मान्य केले ठाकरे गटाचा डाऊन फॉल सुरू

Chandrakant Khaire : चंद्रकांत खैरे यांनी मान्य केले ठाकरे गटाचा डाऊन फॉल सुरू

Chandrakant Khaire

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Chandrakant Khaire  सध्या डाऊन फॉल सुरू असला तरी आपल्याला निवडून येण्यासाठी तडजोड करावी लागेल, नाही तर भाजपा पुन्हा डोक्यावर बसेल, अशी भीती शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.Chandrakant Khaire

चंद्रकांत खैरे म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू (उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे) एकत्र आले, तर त्यामुळे मोठा फरक पडेल आणि त्यामुळे मुंबई महापालिकेवर विजय मिळू शकेल, हे कोणीही नाकारू शकत नाही, ही मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आहे. त्यांच्यामुळेच मुंबई वाचलेली आहे, नाही तर या लोकांनी मुंबई कधीच तोडली असती.Chandrakant Khaire



तेव्हाचे काँग्रेसचे सरकार असेल किंवा आताचे केंद्र सरकार असेल मुबई कशी काबीज करायची? असा त्यांचा प्रयत्न असतो. पण मराठी माणूस हा मराठी नेतृत्वाकडे पहात आहे, त्यामुळे दाव्याने सांगतो दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई महापालिका ताब्यात येऊ शकते, असा विश्वाद खैरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसलाही फटकारताना खैरे म्हणाले, काँग्रेसने अजूनही युतीचा निर्णय घेतला पाहिजे आणि आघाडी धर्म पाळला पाहिजे. काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढला तर कसा मजबूत होणार? असा सवाल त्यांनी केला. बिहारमध्ये किती जागा लढल्या पण एकच जागा आली. राहुल गांधी यांनी जी मतचोरी दाखवली त्याचा काहीच परिणाम बिहारमध्ये झाला नाही, असेही खैरे यांनी म्हटले आहे.

Chandrakant Khaire admits that the downfall of the Thackeray group has begun.

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023