Eknath Shinde : एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा , तक्रारीसाठी नव्हे तरअमित शहा यांची भेट अभिनंदन करण्यासाठी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे रडणारा नाही लढणारा , तक्रारीसाठी नव्हे तरअमित शहा यांची भेट अभिनंदन करण्यासाठी

Eknath Shinde

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Eknath Shinde तक्रारींचा पाढा वाचणारा, रडणारा एकनाथ शिंदे नाही तर लढणारा आहे. आपण ते पाहिले आहे वेळोवेळी. या छोट्या मोठ्या तक्रारी आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.Eknath Shinde

नवी दिल्ली येथे एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, दिल्लीमधून बिहारला आता मी निघणार आहे. त्यामुळे मी बिहारच्या यशाचे अभिनंदन करण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांना भेटलो. चांगली चर्चा त्यांच्यासोबत झाली. बिहारमध्ये दैदीप्यमान यश मिळाले आहे त्यामुळे जाताजाता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भेटलो.Eknath Shinde

शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आणि त्यानंतर तुम्ही अमित शहा यांना भेटला, यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, हे सगळे तुमचे कल्पना विलास आहे, हे तुम्ही पतंग उडवत असता. आतमध्ये मी बसलो आहे आणि बाहेर तुमच्या बातम्या सुरू आहेत. मी एवढे सांगतो की ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्याचे जे काही प्रश्न आहेत हे राष्ट्रीय पातळीवर आणण्याचा काही विषयच नसतो. त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांसोबत बसलो, चर्चा केली. त्यातून एवढेच ठरले की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, कुठेही मतभेद होणार नाही याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे हा विषय संपला आहे. हा विषय इथे दिल्लीत नव्हताच मुळात.Eknath Shinde



रवींद्र चव्हाण यांच्याकडून वेळोवेळी शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातो, यावर एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबतीत त्यांचे जे काही पक्ष श्रेष्ठी आहेत ते निर्णय घेतील. आणि हा विषय काल संपला आहे. त्या विषयाला मी गांभीर्याने घेत नाही. मुख्यमंत्री भाजपचे नेते आहेत आणि मी शिवसेनेचा नेता आहे आम्ही आमच्या नेत्यांना सूचना देण्याचे काम केले आहे. महायुती मजबुतीने निवडणुकांना सामोरे जात आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा चांगले यश मिळणार आहे, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

राज्य मंत्रिमंडळाची मंगळवारी साप्ताहिक बैठक झाली. शिंदे गटाच्या मंत्र्यांनी भाजपवर फोडाफोडीचे आरोप करत या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे हजर होते. पण फडणवीसांनी शिंदें यांच्या पुढेच त्यांच्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली. या घटनेनंतर शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एका व्यासपीठावर एकत्र येणे टाळले. यामुळे एकनाथ शिंदे भाजपवर नाराज झाल्याचा दावा केला जात आहे.

Eknath Shinde says he is a fighter, not a complainer, meets Amit Shah to offer congratulations

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023