विशेष प्रतिनिधी
मुंबई : Aditya Thackeray मतं चोरी आणि चिटिंग सुरूच आहे. जर हे असंच सुरू राहणार असेल, तर मग तुम्ही तुमच्यातच निवडणुका घ्या, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.Aditya Thackeray
मुंबईतील प्रारूप मतदार यादीतील मोठ्या घोळावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे यांनी दीड महिन्यापूर्वीच वरळीतील सभेत मतदार यादीतील घोळाचा मुद्दा सर्वांसमोर आणला होता. मतदार यादीतील घोळावर सर्वच विरोधी पक्ष आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले होते.Aditya Thackeray
1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरल्यामुळे नवे मतदार मतदानापासून वंचित राहणार, असे सांगून आदित्य ठाकरे म्हणाले, प्रारूप यादी वेळोवेळी पुढे ढकलण्यात आली, आधी 7, नंतर 14 आणि शेवटी 20 तारखेला प्रसिद्ध झाली. मात्र, ही यादी मशीन-रीडेबल नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी क्रमांकांमध्ये 1 ते 50 हजारपर्यंत विसंगती आढळत आहेत.
निवडणूक आयोगावर थेट टीका करत आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आयोग सत्ताधाऱ्यांच्या कार्यालयातून चालते. त्यामुळे त्यांना वार्ड कापण्याचंही जमलं नाही. मतदार यादीत इतका घोळ करून ठेवला आहे की, निवडणुका सेट केल्या जात असल्याचा भास होतो. मतं चोरी आणि चिटिंग सुरूच आहे. जर हे असंच सुरू राहणार असेल, तर मग तुम्ही तुमच्यातच निवडणुका घ्या. आम्ही मात्र हरकती देणार आहोत. मात्र आमच्या हरकतींना भाजपाकडून उत्तर मिळणार की निवडणूक आयोग कारवाई करणार?
आदित्य ठाकरे ही गोष्टी जाणीवपूर्वक केली जात असेल तर देशहितासाठी देशद्रोहाचा खटला टाकला पाहिजे. तसेच राज्य निवडणूक आयोगाकडे मतदार यादीतील घोळ आणि मत चोरीचे मुद्दे घेऊन आम्ही जाणार आणि हा चोरीचा डाव मोडून काढणार आहोत.
Vote theft and cheating, then you should hold your own elections: Aditya Thackeray’s anger over voter list
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar : लाेणवळ्यात भाजप विराेधात लढण्यासाठी शरद पवारांची अजित पवारांना साथ
- अवघ्या २० दिवसांपूर्वी घेतलेली थार, काेकणात फिरायला निघाला असताना सहा मित्रांवर काळाचा घाला
- Rajgurunagar : राजगुरूनगरमध्ये नगरसेवक पदाचा चक्क लिलाव!
- Prashant Kishor : तर सत्तेत असलेला पक्ष कधीही हरणार नाही, प्रशांत किशाेर यांची भीती