विशेष प्रतिनिधी
मुंबई : Sanjay Raut शिंदेसेनेचा कोथळा अमित शाहच काढणार असून दिल्लीतल्या शाहांची ही परंपरा आहे. ज्यापद्धतीने आमच्यासोबत भाजपाने जे केले, त्याचरितीने शिंदेसेनेचे आमदार फोडण्याचं काम व्यवस्थित सुरू आहे. शिंदेसेनेचे ३५ आमदार फुटणार आहेत, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. आमचा कोथळा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही त्यातून बाहेर पडलो. असेही त्यांनी सांगितले.Sanjay Raut
आजारपणामुळे गेले काही दिवस सक्तीच्या विश्रांतीवर असलेले ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रथमच पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना राऊत म्हणाले की, रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांची नेमणूक खास शिंदेसेना फाेडण्यासाठीच केली आहे. ज्यांना राजकारण कळतं, त्यांनी ते समजून घेतले पाहिजे. आम्ही वारंवार तेच सांगतोय, डिसेंबरनंतर पाहा काय होते. दिल्लीतले २ महान नेते त्यांच्या पाठीशी आहेत असं शिंदेसेनेला वाटते, परंतु ते कुणाच्याच पाठीशी नाहीत.Sanjay Raut
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, अमित शाह यांना कायद्याच्या बाहेर जाऊन मदत केली. तरी त्यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही तिथे शिंदे कोण? शिंदेसेना फुटली आहे. अमित शाहांनी निर्माण केलेला हा गट आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आजही मजबुतीने उभी आहे, असेही ते म्हणाले.
पैशाच्या ताकदीवर निवडणूक जिंकणे ही लोकशाही नाही. आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून नेतृत्व पाहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनाही भ्रष्ट नेत्यांना रोखण्यात अपयश आले आहे. पैशांवर माणसं विकत घेता येतात, त्यावर राजकारण चालत नाही.
कोकणात कशाप्रकारे पैशाचे वाटप होतंय हे दाखवण्याचा निलेश राणेंनी प्रयत्न केला. निलेश राणे यांचे आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे आमचे मतभेद असतील. पण निवडणुकीत पैशाचे वाटप कसे होते हे त्यांनी दाखवले. याचा अर्थ शिंदेसेना पैसे वाटत नाही का? तर त्याहून अधिक वाटतायेत. कोकणात निलेश राणे यांनी कसे पैसे येतात, कसे वाटप होते यावर प्रकाश पाडला. निवडणूक आयोगाने निलेश राणेंची दखल घेण्याऐवजी त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला हे योग्य नाही असं संजय राऊत यांनी सांगितले.
Shinde Sena headed for a split, Amit Shah will reveal everything, says Sanjay Raut
महत्वाच्या बातम्या
- Lt Gen Manjinder Singh : लेफ्टनंट जनरल म्हणाले- पाकने 90 तासांत गुडघे टेकले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दीर्घ लढाईची तयारी होती
- Adani : अदानींनी 5 वर्षांपूर्वीचा कायदेशीर खटला संपवला; कोळसा खाण प्रकरणात ऑस्ट्रेलियाच्या कार्यकर्त्याशी समझोता
- पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??
- भय्याजींच्या दूरदृष्टीतून ईशान्य भारतात ईश्वरी कार्य ऊभे; भैय्याजी जोशींचे गौरवोद्गार; भैय्याजी काणे जन्मशताब्दी सांगता