विशेष प्रतिनिधी
मुंबई : Uddhav Thackeray मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) विरुद्ध shivसेना (ठाकरे बंधू) हे ८७ जागांवर परस्परांसमोर उभे असून, येथे थेट रंगतदार लढती होणार आहेत.Uddhav Thackeray
मुंबईतील मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या वॉर्डात या लढती होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर मुंबईत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य आणि वायव्य मुंबई या तीन जागी शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात सामना झाला होता. यात शिंदेंनी १, तर ठाकरेंनी २ जागा जिंकल्या होत्या.Uddhav Thackeray
महानगरीतील वायव्य मुंबई शिंदे गटाने, तर उर्वरित दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य या दोन जागा उद्धव ठाकरे गटाने जिंकल्या होत्या. यावेळी मनसेने भाजपप्रणीत महायुतीला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकीत दादर, माहिम, भायखळा यासह मराठीबहुल क्षेत्रात दहा जागांवर शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांच्यात सामना झाला होता. त्यातील ७ जागा ठाकरे गटाने जिंकल्या होत्या; पण आता समीकरणे आणखी बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटासोबत राज ठाकरे यांच्या मनसेची युती झाली आहे. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन ठाकरे बंधू एकत्र असल्याने होणार नाही, असे दोघांना वाटते.Uddhav Thackeray
मुंबई महापालिका निवडणुकीत यावेळी सेना (शिंदे गट) विरुद्ध उद्धव ठाकरे गट हे ६९ जागांवर परस्परांसमोर उभे आहेत, तर शिंदे गट विरुद्ध मनसे १८ जागांवर परस्परांसमोर उभे आहेत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकलेले तत्कालीन शिवसेनेचे ५० हून अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात गेले आहेत. त्यातील काही माजी नगरसेवकांना शिंदे गटाने तिकीट दिले आहे; पण मराठी मतांसोबत भाजपची मते हस्तांतरित झाली तर त्यांना विजयाची संधी आहे. मराठीबहुल भागात ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे मराठीबहुल जागा निवडून आणणे शिंदे यांच्यापुढे आव्हान आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात ९७ जागांवर सामना आहे, तर मनसे ३५ जागांवर भाजपच्या विरुद्ध लढत आहे. ठाकरे बंधूंना शिंदे गटाविरोधातील जागांवरील लढतीत विजयाची शक्यता जास्त आहे. गुजराती, राजस्थानी, उत्तर भारतीय मतांचे प्राबल्य असलेल्या जागांवर ठाकरे बंधूंची कसोटी लागेल.
Shiv Sena vs Shiv Sena, BJP and Uddhav Thackeray group in 97 seats in Mumbai
महत्वाच्या बातम्या
- प्रभाग २५ मध्ये भाजपा उमेदवारांचा घरोघरी संपर्क दौरा
- तुमको मिर्ची लगी तो मै क्या करू, बिनविराेधवरील टीकेवर मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबाेल
- Ashish Shelar : सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, आशिष शेलार यांचा अजित पवारांना इशारा
- छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार समाजाचे ! केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांच्या विधानाने महाराष्ट्रात संताप