विशेष प्रतिनिधी
मुंबई : Shivaji Park वर्षभर क्रिकेटमध्ये रंगून जाणारे छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आता लवकरच राजकीय चौकार-षटकारांची आतषबाजी होताना दिसणार आहे. प्रत्येकच निवडणुकीत या मैदानाने आपले महत्व कायम अधोरेखित केले आहे. मुंबई पालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजवर येथे अनेक सभा, मेळावे गाजले आहेत. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या अंतिम टप्यात काँग्रेस वगळता भाजप, शिंदेसेना, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी अर्ज केल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.Shivaji Park
दादरमधील हे मैदान नेहमीच मोठ्या राजकीय घडामोडींचे साक्षीदार राहिले आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा, मनसेचा गुढीपाडवा मेळावा यांसह अनेक ऐतिहासिक सभा येथे झाल्या आहेत. आता पालिका निडणुकासाठी या ठिकाणी सभा घेण्यासाठी पक्षांनी दिलेले सर्व अर्ज नगरविकास विभागाकडे पाठवण्यात आले असून, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंसह मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या तोफा धडाडणार असून, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.Shivaji Park
मुंबईचे केंद्रबिंदू असलेल्या या मैदानात मोठ्या सभांसाठी भव्य व्यासपीठ उभारणे, झेंडे, भव्य स्क्रीनसाठी बांबू रोवणे, कार्यकर्त्यांसाठी खुर्थ्यांची व्यवस्था केली जाते. संपूर्ण मुंबईतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी गोळा करणे सर्वच राजकीय पक्षांना तुलनेने सोपे जाते. प्रशस्त अशा या मैदानात लाखोंच्या संख्येने लोक जमतात, त्यामुळे सर्वच पक्ष प्रचारसभांसाठी या मैदानाला प्राधान्य देतात. एकूणच, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, या वर्षी शिवाजी पार्क कोण गाजवणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुंबई महापालिकेतील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या निवडणुका अधिक चुरशीच्या ठरणार आहेत. शिवसेनेचे दोन गट आमनेसामने असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र निवडणूक लढवत आहेत, तर भाजप-शिंदेसेना युती एकत्र मैदानात उतरली आहे. प्रचाराचा शेवटचा टप्पा आल्याने ११, १२ आणि १३ जानेवारी या तारखांसाठी शिवाजी पार्कवर सभा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Political fielding for Shivaji Park: The last three days of batting
महत्वाच्या बातम्या
- Nitesh Rane : आपल्या बॅगा भरून ठेवा…नीतेश राणे यांनी दिला राेहिंग्या – बांगलादेशींना इशारा
- मुंबईचा ‘मराठी टक्का’ आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?
- BJP’s Promise : भाजपचा संकल्प : पुण्यासाठी एक हजार ई-बस, मेट्रोसह विमानतळाचा विस्तार
- संदीप लोणकर यांचे प्रचारात लाडक्या बहिणींकडून स्वागत