Rohit Pawar : काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना दिली शपथ, रोहित पवार यांचा अजित पवार गटाच्या नेत्यांवर निशाणा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar काकींची ( सुनेत्रा पवार ) इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांचे प्राधान्य वेगळे आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला हे आमच्यासाठी प्राधान्याची गोष्ट आहे. काकी, पार्थ आणि जयलाही हे महत्त्वाची आहे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवार निशाणा साधला आहे.Rohit Pawar

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावर आता दिवंगत अजित पवार यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले आहे. मंगळवारी (10 फेब्रुवारी) अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुनेत्रा पवार यांची इच्छा नसतानाही शपथ दिली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे.Rohit Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या शपथविधीबाबत रोहित पवार म्हणाले की, “त्या नेत्यांकडे सत्ता आहे, राज्यात त्यांना सत्ता टिकवण्यासाठी, ती सत्ता तशीच राहावी म्हणून ती गोष्ट महत्त्वाची वाटली असेल. मूळ विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्या विषयाकडे त्यांचे लक्ष गेले. काकींची इच्छा नसताना त्यांनी त्यांना शपथ दिली असावी. सर्वांचे प्राधान्य वेगळे आहेत. आमच्या काकाचा अपघात झाला हे आमच्यासाठी प्राधान्याची गोष्ट आहे. काकी, पार्थ आणि जयलाही ही महत्त्वाची आहे. नेत्यांना काय महत्त्वाचे हे गेल्या काही दिवसांपासून सर्वांना माहीत आहे. ज्यांना कोणाला काही वाटते ते वाटू द्या. ते चार ते पाच लोकं वेगळे असून त्यांचा पक्षही वेगळा आहे. आमच्यासाठी काका महत्त्वाचे असून अपघात कसा झाला? याची उत्तरे आम्हाला माहित पाहिजे.”Rohit Pawar



शरद पवार यांनी, अजित पवार यांचा फक्त अपघात असल्याचे विधान 28 जानेवारीला केले होते. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, शरद पवारांनी 28 तारखेला विधान दिले. तेव्हा कदाचित अपघाताला 6 तास झाले असतील. मी 13 दिवसांनी बोलत आहे. 6 तासांनी काय माहिती मिळणार? दुसऱ्या दिवशी लाखो लोक येणार होते. त्यामुळे अर्धवट माहिती दिली तर लाखो लोक काहीही करू शकले असते. तेवढी प्रगल्भता पवार साहेबांकडे आहे. म्हणून मी 13 दिवसानंतर मी बोलत आहे. शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याने मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. मी सतत सांगत होतो. ते साहेबांना माहीत होते. मुळे साहेबांनी मला काही विचारले नाही. मीही त्यांना माहिती दिली नाही. पण त्यांच्या मनात काय आहे हे मला कळतं.

Rohit Pawar Targets Ajit Pawar Faction Leaders, Says Aunt Was Made to Take Oath Against Her Will

महत्वाच्या बातम्या