District Collector : आता एनएसमी परवानगीची गरज नाही:बांधकाम नकाशा हाच एन ए, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची गरज नाही, कायद्यात महत्वाची सुधारणा

विशेष प्रतिनिधी

मुबई: District Collector मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे.District Collector

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार जमीन महसूल कायद्यात बदल केला आहे. या बदलानुसार, आता अकृषक कर आकारला जाण्याची सुविधा पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. जमीन मालकांना फक्त एकरकमी ‘रुपांतरण अधिमूल्य’ भरावे लागेल. या रकमेच्या भरपाईनंतर जमीन अकृषक वापरासाठी रुपांतरित करता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना सनद घेण्याची गरजही संपुष्टात आली आहे. बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए परवानगी मानली जाईल. यामुळे जमीन रुपांतर प्रक्रिया अधिक जलद, सोपी व पारदर्शक होईल.District Collector



 

उल्लेखनीय बाब म्हणजे आतापर्यंत अकृषक वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक होते. यासाठी विविध दस्तऐवज गोळा करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत होते. पण महसूल विभागाने तयार केलेल्या नवीन कार्यपद्धतीनुसार शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ व सोपे होणार आहे. ही कार्यपद्धती राजपत्रातही प्रकाशित करण्यात आली आहे.

मुंबई6 तासांपूर्वी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची कोणतीही गरज नाही.आता बांधकाम आराखडा मंजुरीलाच एनए मानले जाणार आहे. सरकाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

No More NA Permission Required: Building Plan Itself Deemed NA; Major Legal Reform Ends Need for Separate District Collector Approval

महत्वाच्या बातम्या