Shiv Sena : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? 18 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Shiv Sena शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे यावर आता 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नवीन तारीख दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आले आहे.Shiv Sena

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंडखोरी करत शिवसेनेचे 40 आमदार फोडले होते. त्याला साडेतीन वर्षे झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 2023 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 18 फेब्रुवारी रोजी सुनावणी आहे. ही सुनावणी गेल्या आठवड्यात (21 जानेवारी) होणार होती. मात्र, त्यावेळी सुनावणी न होता चार आठवड्यांनंतरची तारीख होईल, असे सांगितले होते. आता सर्वोच्च न्यायालयाने नवीन तारीख दिल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर नमूद केले आहे.Shiv Sena



जून 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यापासून पक्ष आणि चिन्हाचा वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीमध्येही फूट पडली होती. या दोन्ही पक्षांचा वाद सर्वोच्च न्यायालयात असून त्यावर 21 जानेवारी रोजी सुनावणी होणार होती. विशेष म्हणजे 23 जानेवारी 2026 पासून बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर चिन्ह तसेच पक्ष कुणाचा यावरून तीन वर्षांहून अधिक काळ सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय दिला होता. त्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत पक्ष आणि चिन्ह मिळण्याची मागणी केली होती. तेव्हापासून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असून एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडून पक्ष आणि चिन्हावर दावा करून कब्जा केल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू असतानाच मे 2024 मध्ये लोकसभा आणि नोव्हेंबर 2024 मध्ये विधानसभेची निवडणूकक झाली. तरीही पक्ष आणि चिन्हाचा निर्णय झाला नाही. गेल्या महिन्यात डिसेंबर 2025 मध्ये नगरपरिषद, नगरपंचायती तसेच जानेवारी 2026 मध्ये 29 महापालिकांच्या आणि फेब्रुवारीमध्ये 12 जिल्हा परिषदांसोबत 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. तरीही निकाल न लागल्याने शिंदेंच्या शिवसेनेने धनुष्यबाण आणि ठाकरेंच्या शिवसेनेने मशाल चिन्हावर निवडणुका लढवल्या हो

Who Owns Shiv Sena Party and the Bow and Arrow Symbol? Supreme Court to Hear Case on February 18

महत्वाच्या बातम्या