पैशाचा महापूर होता, तरीही निष्ठेची भिंत कोसळली नाही, उद्धव ठाकरे यांनी केले उमेदवारांचे कौतुक

विशेष प्रतिनिधी

मुंबई : निवडणुकीत पैशाचा महापूर होता, तरीही निष्ठेची भिंत कोसळली नाही. लोक आजही आपल्याकडे आशेने पाहतात. कार्यकर्त्यांना निराश न होता आगामी लढतींसाठी सज्ज राहण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. Uddhav Thackeray

उरण आणि रायगड येथील शिवसेना उबाठाच्या विजयी उमेदवारांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत ठाकरे यांनी सर्वांचे अभिनंदन केले . ते म्हणाले. प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवणाऱ्या उमेदवारांचे कौतुक आहे. तुम्ही खरोखरच कमाल केली आहे. कठीण वातावरणातही तुम्ही यश मिळवलंत, हे कौतुकास्पद आहे.आजची परिस्थिती आपल्या विरोधात असली, तरी उद्याचा काळ आपलाच असेल. तुम्ही या निवडणुका ज्या धैर्याने लढलात, त्यातूनच आपली ताकद दिसते. Uddhav Thackeray



राज्यात नुकत्याच पार पडलेल्या 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समिती या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुतीने सर्व 12 जिल्हा परिषदांवर विजय मिळवत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः ग्रामीण भागात अपेक्षित कामगिरी न झाल्याने आघाडीला पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पराभव मान्य केला. Uddhav Thackeray

Money Was Flowing Like a Flood, Yet Loyalty Did Not Collapse,” Uddhav Thackeray Praises Party Candidates

महत्वाच्या बातम्या