विशेष प्रतिनिधी
मुंबई : नागपूरहून आलाे तेव्हा शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ अशी ‘सांस्कृतिक’ मराठी बोलत होतो. पण इथे आल्यावर मला लक्षात आले की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल असे मला वाटले. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगले मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. Chief Minister
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुंबईत आल्यानंतर आपल्याला आलेल्या भाषिक अडचणीची आठवण सांगितली. महाराष्ट्र विधानमंडळातील मध्यवर्ती सभागृहात आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘जावे विनोदाच्या गावा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील प्रमुख नेत्यांनी यावेळी आपली भूमिका मांडली. त्यात मुख्यमंत्र्यांनी अगदी विनोदी शैलीत नागपूरहून मुंबईत आल्यानंतर आलेले अनुभव कथन केले. यावेळी त्यांनी आपल्या खास वैदर्भीयन स्टाईलमध्ये केलेल्या कोट्यांमुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता. Chief Minister
मुख्यमंत्री म्हणाले, आपली मराठी भाषा दर 5-7 किलोमीटरवर बदलते. मी मुंबईत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळात मला फार अडचणी आल्या. कारण मी तेव्हा शब्दाशब्दाला ‘का बे’, ‘साल्या’ अशी ‘सांस्कृतिक’ मराठी बोलत होतो. पण इथे आल्यावर मला लक्षात आले की ही संस्कृती मुंबईला पटण्यासारखी नाही. पुण्यात तर आपल्याला बहिष्कृतच केले जाईल असे मला वाटले. त्यामुळे मी हळूहळू स्वत:ला चांगले मराठी कसे बोलता येईल या दिशेने नेले. पण प्रत्येक भागातल्या मराठीचा आपला गोडवा आपल्याला कायम ठेवायचा आहे. Chief Minister