Girish Mahajan : आपला पक्ष सांभाळा, गिरीश महाजनांचा संजय राऊतांना टोला, खडसेंवरही गंभीर आरोप

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Girish Mahajan भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत, “आपला पक्ष आधी सांभाळा,” असा टोला लगावला आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विजय कसा मिळवायचा, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला.Girish Mahajan

राऊत यांनी शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील हे भविष्यात भाजपकडून निवडणूक लढवतील असा दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले की, “आमचे लोक आम्ही परत घेणार नाही. पण तुम्ही तुमच्या मूठभर उरलेल्या लोकांना तरी सांभाळा.” तसेच अजित पवार गट आणि शिंदे गटातून कोण भाजपमध्ये येणार, या चर्चांना जनता कंटाळली असल्याचेही त्यांनी नमूद केले.Girish Mahajan



याचवेळी महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावरही निशाणा साधला. “तुम्हाला माझ्याविरोधात काही तक्रार करायची असेल तर करा. पण आधी तुमच्यावर दर आठवड्याला सुरू असलेल्या चौकशा आणि गुन्ह्यांकडे लक्ष द्या,” असे ते म्हणाले. खडसे हे ७ ते ८ गुन्ह्यांमध्ये अडकले असल्याचा दावा करत, १३६ कोटी रुपयांच्या रॉयल्टी प्रकरणात दंड झाल्याचाही उल्लेख त्यांनी केला.

महाजन यांनी पुढे जमीन व्यवहारांवरूनही खडसेंवर आरोप केले. “मी महार वतनाची जमीन असल्याचे कळताच ती परत केली आणि घेतलेले पैसेही परत दिले. मात्र, तुम्ही मुलीच्या नावावर घेतलेली जमीन का परत करत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित प्रकरणात एक महिला अजूनही न्यायासाठी भटकत असल्याचे सांगत त्यांनी खडसेंवर टीका केली.

अशोक खरात प्रकरणावर बोलताना महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या कथित फोन कॉल्सची चौकशी सुरू आहे. फक्त फोनवर संवाद झाला म्हणून कुणी गुन्हेगार ठरत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

“Focus on Your Party,” Girish Mahajan Jabs Sanjay Raut; Levels Serious Allegations Against Eknath Khadse

महत्वाच्या बातम्या