विशेष प्रतिनिधी
बुलढाणा: Congress Leader महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्याविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. जिला आपण मोठी पतिव्रता असल्याचे दाखवायचे आहे तीच मोठे मंगळसूत्र घालते आणि मोठे कुंकू लावते असे तारे या नेत्याने तोडले.Congress Leader
चिखलीचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची जीभ घसरली असून, आपली राजकीय निष्ठा स्पष्ट करताना त्यांनी महिलांचा नामोल्लेख करून दिलेल्या एका उदाहरणावरून नवा वाद ओढवून घेतला आहे. या विधानाचे तीव्र पडसाद चिखली शहरात उमटले असून संतापलेल्या महिलांनी बोंद्रे यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करत तीव्र निषेध नोंदवला. मला वारंवार मी काँग्रेसमध्येच आहे हे सांगण्याची गरज नाही,” असे त्यांना सुचवायचे होते, पण त्यासाठी त्यांनी महिलांच्या वैयक्तिक श्रद्धेचा आणि चिन्हांचा आधार घेतल्याने जनसामान्यांतून, विशेषतः महिला वर्गातून संताप व्यक्त होत आहे.Congress Leader
गेल्या दोन दिवसांपासून राहुल बोंद्रे हे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीमुळे चर्चेत होते. गायकवाड यांनी बोंद्रे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने बोंद्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. या पार्श्वभूमीवर आज आयोजित पत्रकार परिषदेत बोंद्रे यांना विचारले असता, त्यांनी भाजप आणि विरोधकांच्या रणनीतीवर टीका केली. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली.
बोंद्रे म्हणाले, भाजपवाल्यांची देशभरातील पॉलिसी आहे, त्यांच्याबद्दल चर्चा करत राहायची. कार्यकर्त्यांवर दबाव निर्माण करायचा आणि त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घ्यायचा. त्यानुसार त्यांची ही सोची समझी चाल आहे, त्यानुसार ते चर्चा करत राहतात. मी एकदाच सांगितलं आहे, परत परत सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जी कोणी महिला असते.. तिला दाखवावं लागतं किती पतीव्रता आहे, ती मोठ कुंकू लावते, मोठ मंगळसूत्र घालते. प्रत्येकाला तशी आवश्यकता नसते.”
पत्रकारांनी राहुल बोंद्रे यांना शिवसेनेच्या पक्षप्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता, बोंद्रे यांनी भाजप आणि विरोधकांच्या रणनीतीवर टीका केली. मात्र, आपली निष्ठा सिद्ध करताना त्यांनी महिलांचा उल्लेख करत एक अजब उदाहरण दिले. ते म्हणाले, “जी कुणी महिला असते… जिला दाखवाव लागतं की, मी पतिव्रता आहे. ती मोठं कुंकू लावते आणि मोठे मंगळसूत्र घालते”, असे उत्तर त्यांनी दिले.
Congress Leader Sparks Row with Offensive Remark on Married Women’s Symbols
महत्वाच्या बातम्या
- डोंबिवली अत्याचार प्रकरणी कठोर कारवाईची करा; मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांकडे डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी
- गुरुवारच्या पावसानं महापालिकेचे वाभाडे काढले;ओढे-नाल्यांवरील अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालणार!
- बारामतीत पोटनिवडणुकीत काँग्रेसची ‘एंट्री’; प्रशांत जगतापांनी स्पष्ट सांगितलं!
- बारामतीला पावसाचा फटका; शेतकऱ्यांचे नुकसान; जय पवार थेट बांधावर!