विशेष प्रतिनिधी
बारामती : बारामतीची सेवा म्हणजे पांडुरंगाची सेवा आहे. अजितदादांचे हे विचार होते. त्यांच्यानंतर मी माझे दुःख तळघरात कोंडून तुमच्या सेवेसाठी पुढे आले आहे, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले. Sunetra Pawar
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आपला अर्ज दाखल केला. अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बारामतीमध्ये दाखल झाले होते. ते म्हणाले, आपल्याला ही निवडणूक दुर्दैवाने लढवावी लागत आहे.
अजित दादांच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राज्य दुःखाच्या सागरात बुडाले होते. त्यांचे काम केवळ बारामतीत नाही तर संपूर्ण राज्यात होते. अनेक खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होते. लोकाभिमुख असे नेतृत्व, एक उत्तम प्रशासक, उत्तम संघटक म्हणून त्यांनी काम केलं आहे. अनेक वर्ष आम्ही एकत्रपणे काम केले आहे.
यावेळी बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, सुनेत्रा पवार यांना केवळ बारामतीच्या आमदार म्हणून नाही तर राज्याच्या नेत्या म्हणून लक्षात ठेवून त्या दृष्टिकोनातून पुढची वाटचाल असायला हवी. आजही मंत्रालयात गेल्यावर अजित दादा कुठून तरी येतील असे वाटते. त्यामुळे या निवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत वेगळी आहे. अनेक पक्षांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील या संदर्भात भावनिक आवाहन केले आहे. या निवडणुकीची पार्श्वभूमी वेगळी आहे. म्हणून ही निवडणूक बिनविरोध व्हायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. या आधी देखील असा प्रसंग ज्या- ज्या वेळी आला, त्यावेळी सर्व पक्षांनी समंजसपणा दाखवला आहे. तोच समंजसपणा आज अनेक पक्षात दाखवत आहेत.
प्रफुल्ल पटेल म्हणाले , आज सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल होत असून, यासाठी पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बारामतीच्या जनतेने दिवंगत दादांवर जसं प्रेम केलं, तसंच प्रेम आता सुनेत्रा पवार यांच्यावरही करेल. या पोटनिवडणुकीत इतर कोणत्याही पक्षाने उमेदवार उभा करू नये. सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल.
Locked My Grief Away to Serve You: Sunetra Pawar’s Emotional Appeal
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर