विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या भाजपमध्ये लोंढेच्या लोंढे येतायेत. पण ज्या निष्ठावंतांनी भारतीय जनता पार्टीचे फाउंडेशन केले, त्यासाठी खूप मोठे कष्ट केले. त्या लोकांना आपली आठवण आली पाहिजे, भारतीय जनता पार्टीच्या मोठ्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करताना एंट्री पास देताना त्यांना लक्षात ठेवले पाहिजे, अशी खंत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बोलून दाखवली. Madhuri Misal
भारतीय जनता पार्टीचा 46 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात भाजपा पुणे शहर कार्यालयात पार पडला. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मिसाळ म्हणाल्या, राष्ट्रहिताला प्रथम प्राधान्य देत, गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी देशाचा सर्वांगीण विकास आणि सुशासनासाठी कार्यरत आहे. संघटनात्मक कार्य, देशभक्ती, सेवा समर्पण या मूल्यांवर आधारित वाटचाल करणाऱ्या भाजपासोबत करोडो कार्यकर्ते जोडले गेले आहेत. ४६ वर्षांपूर्वी पेरलेल्या बीजाचा आज सर्वात मोठा वटवृक्ष झाला आहे. सदैव राष्ट्र प्रथम नंतर पक्ष आणि शेवटी” स्वतः ही शिकवण देणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर, पुणे शहराच्या महापौर मंजुषा नागपूरे, भाजपा पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्यासह पुणे शहर पदाधिकारी नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Consider Loyal Workers Before Granting BJP Entry Passes, Says Madhuri Misal
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले त