विशेष प्रतिनिधी
पुणे: देशाच्या राजधानीत संसदेच्या उच्च सभागृहात आज एक मोठी घडामोड घडली.राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी दिल्लीत संसद भवनात राज्यसभा खासदार म्हणून अधिकृतरित्या शपथ घेतली.राज्यसभा सभापती सी. पी राधाकृष्णन यांनी पार्थ पवार यांनी शपथ दिली.शपथविधी सोहळा संसद भवनात पार पडला.यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,खासदार सुनील तटकरे,खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित होते.
शपथ घेतल्यानंतर पार्थ पवार म्हणाले की,इथून पुढे अपेक्षा नुसार काम करण्याचा निर्धार केला आहे. राज्य आणि देशाच्या विकासासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन.तरुण पिढीच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर माझा भर असेल.
पार्थ पवारांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा
पार्थ पवार यांनी आज दिल्लीत राज्यसभा खासदार पदाचे अधिकृत शपथ घेतली. यावेळी त्यांचा पेहरावाची चर्चा सर्वत्र होत आहे.पार्थ पवारांनी वडील अजित पवार यांचा स्टाईल प्रमाणे गुलाबी जॅकेट परिधान केले होते.
राज्यसभेत प्रवेश मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचा राष्ट्रीय राजकारणात औपचारिक प्रवेश झाला आहे.महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांची दृष्टीने ही घडामोड महत्वाची मानली जात आहे. पार्थ पवारांचा निवडीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नगर रणनीतीची सुरुवात झाली असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.
Wearing glasses and a pink jacket! Parth Pawar took oath as an MP..
महत्वाच्या बातम्या
- Mandatory PNG Shift : सुविधेच्या ठिकाणी पीएनजी जोडणी घ्यावीच लागणार; एलपीजीवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय
- देशात अनेक शहरांमध्ये इंधनासाठी रांगा; पण प्रत्यक्षात देशात इंधनाचा पुरेसा साठा; मोदी सरकारचा खुलासा
- Amid West Asia : एप्रिलमध्ये रशियाकडून 6 कोटी बॅरल कच्चे तेल खरेदी करेल भारत; सवलतीऐवजी प्रीमियमवर मिळेल
- कुटुंब टिकले तरच धर्म आणि राष्ट्र टिकेल, समाज सुरक्षित राहील; पुण्यातल्या कोथरूड मधल्या विराट संमेलनात एकमुखी सूर