Aasha Bhosale : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Aasha Bhosale ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी दुपारी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न आणि ‘गानसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखले जात होते.Aasha Bhosale

आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांसमोर येऊन आशा ताईंच्या निधनाची बातमी साश्रू नयनांनी दिली. उद्या (सोमवारी) सकाळी अकरा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर आशा भोसले यांची अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.Aasha Bhosale



तब्बल सहा दशकं त्यांनी केवळ हिंदीतच नाही तर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायलीत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायली. ‘दम मारो दम’ आणि ‘ओम शांति ओम’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी आशा भोसले यांनी इंडस्ट्रीला दिली.

आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थामुळे तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले यांची नात जनाई भोसले हिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या आजीच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. “माझ्या आजीला चेस्ट इंफेक्शन आणि खूपच अशक्तपणा आलाय… त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय… कृपया आमच्या प्रायव्हसीचा आदर राखा, तिच्यावर उपचार सुरू आहेत… ती लवकरच बरी होईल…”असे तिने म्हटले होते.

Veteran singer Aasha Bhosale passed away

महत्वाच्या बातम्या