Government schemes : शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडे शरीरसुखाची मागणी

विशेष प्रतिनिधी

जळगाव : Government schem मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करुन देण्याच्या नावाखाली जळगावात एका नराधमाने महिलांच्या हतबलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांकडे शरीरसुखाची आणि प्रेमसंबंधाची मागणी केल्याप्रकरणी गोकुळ चव्हाण नावाच्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ई-केवायसीच्या नावावर होणाऱ्या खोट्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.Government schem

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करुन देणे, बंद पडलेले निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देण्याच्या नावाखाली गोकुळ चव्हाण हतबल महिलांच्या घरी जायचा व त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा. आरोपी चव्हाणच्या या मागणीमुळे हादरलेल्या एका महिलेने पोलिसांत तक्रार करुन चव्हाणला अद्दल घडवली आहे. पीडित महिलांच्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या नराधमाने आणखी किती महिलांना अशा प्रकारे त्रास दिला आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.Government schem



मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र, ई-केवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून, महिला मोबाईलवरून स्वतः ई-केवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ई-केवायसीच्या बहाण्याने लाभार्थी महिलांकडून गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ई-केवायसी करून देतो असे सांगून काहीजण महिलांची दिशाभूल करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये तसेच खोट्या भूलथापांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

Sexual favours sought under guise of government schemes

महत्वाच्या बातम्या