नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील एचआर मॅनेजर निदा खान दहा दिवसांपासून फरार, अटकेनंतरच समाेर येणार विदेशी कनेक्शन

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिक ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य संशयित टीसीएस कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान ही गेल्या दहा दिवसांपासून फरार आहे. नाशिक पोलिसांची विविध पथके तिच्या मागावर आहेत. तिच्या अटकेनंतरच या प्रकरणातील धक्कादायक बाबी समोर येण्याची आणि या कारस्थानामागे मलेशिया कनेक्शन किंवा विदेशी संस्थांचे अर्थसाहाय्य आहे की स्थानिक पातळीवरच कुठली संस्था मदत करत आहे, हे सत्य उघडकीस येईल, असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. निदा खान ही मुळची पुण्याची आहे. Nida Khan

नाशिक शहरातील टीसीएस या नामांकित कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या गंभीर आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता थेट दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले असून त्यांनी कंपनीत सखोल तपास सुरू केला आहे.



कंपनीत महिला कर्मचाऱ्यांच्या छळवणूक आणि धर्मांतराच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात निदा खान हीच मुख्य सूत्रधार असल्याचा धक्कादायक उलगडा पोलिस तपासात झाला आहे. निदा खान दिवसांपासून फरार आहे. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून तीन स्वतंत्र पथके तयार करून विविध ठिकाणी छापे टाकले जात आहेत. निदा खान कंपनीत ऑपरेशन विभागात मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम करत होती. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीच या संपूर्ण प्रकरणात प्रमुख भूमिका बजावत होती.

या गुन्ह्यात आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली असून निदा खान हिचा शोध घेतला जात आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली आहे. या गुन्ह्यात संशयितांना काही कट्टरपंथीय संस्था मदत करत होत्या का? आणि फॉरेन कंपन्यांनी अर्थसाहाय्य केले का? याचा तपास केला जाईल. मात्र, अद्याप याबाबत काहीही ठोस माहिती पुढे आलेली नाही, असे पाेलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

HR Manager Nida Khan in Nashik ‘Corporate Jihad’ case absconding for ten days, foreign connections will be finalised only after arrest

महत्वाच्या बातम्या