हाउसकीपिंगच काम; महिनाभर गुप्त तपास,नाशिक पोलिसांचं ‘अंडरकव्हर ऑपरेशन’ नेमकं काय होत?

विशेष प्रतिनिधी

नाशिक:शहरातील एका नामांकित राष्ट्रीयकृत कंपनीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचारी आणि तरुणींच्या लैंगिक शोषण व धर्मांतरणाच्या कथित प्रकारांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान नाशिक शहर पोलिसांनी अवलंबलेली अचूक, संयमी आणि गुप्त रणनीती आता समोर आली असून, महिला पोलिस अधिकाऱ्यांनी कर्मचारी बनून केलेल्या अंडरकव्हर ऑपरेशनमुळे या प्रकरणातील अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत.

या प्रकरणाची सुरुवात एका तरुणीपासून झाली. वीसच्या सुरुवातीच्या वयातील ही तरुणी संबंधित राष्ट्रीयकृत कंपनीत कार्यरत होती. काही काळातच तिच्या जीवनशैलीत आणि धार्मिक विचारांमध्ये आणि वागणुकीत लक्षणीय बदल दिसून येऊ लागले. या बदलांमुळे तिच्या कुटुंबीयांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ छापा टाकण्याऐवजी अधिक सखोल आणि ठोस पुरावे मिळवण्यासाठी वेगळी रणनीती आखण्याचा निर्णय घेतला.



पोलिसांकडून रणनीती कशी आखण्यात आली?

फेब्रुवारी २०२६ च्या सुरुवातीला नाशिक पोलिसांना संबंधित कंपनीतीला कर्मचाऱ्यांचा वर्तनाबाबत गुप्त माहिती मिळाली होती.या माहितीच्या आधारे नाशिकचे शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा मार्गदर्शनाखाली एक नियोजित ‘ अंडरकव्हर ऑपरेशन ‘ राबवण्यात आले.एका ऑपरेशन माध्यमातून नाशिक पोलिस दलातील काही महिला पोलिस आणि अधिकारी संबंधित कंपनीत हाऊसकिपिंग स्टाफ म्हणून काम करण्यास रुजू झाल्या.जवळपास एक महिना त्यांनी कंपनीत रोज घडणाऱ्या गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले.कंपनीत घडणाऱ्या संशयास्पद वर्तनाची नोंद केल,आणि रोज घडणाऱ्या गोष्टींचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सादर केला.एक महिनाभराचा सातत्यपूर्ण तपास आणि संयमामुळे संबंधित कंपनीत नेमके काय घडत आहे?या गोष्टींचा उलगडा झाला.

एकूणच, नाशिकमधील हे प्रकरण कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला सुरक्षेच्या प्रश्नांना नव्याने अधोरेखित करणारे ठरले आहे. पोलिसांनी आखलेल्या अंडरकव्हर रणनीतीमुळे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले असले, तरी कंपन्यांमधील अंतर्गत घडणाऱ्या आक्षेपार्ह गोष्टी आणि महिला कर्मचाऱ्याचा सुरक्षेबाबत उपस्थित झालेले प्रश्न, यावर आता गंभीर चर्चा होण्याची गरज निर्माण झाली आहे.

Housekeeping is the only job; A month-long secret investigation, what exactly is going on in the ‘undercover operation’ of Nashik police

 

महत्वाच्या बातम्या