राष्ट्रीय महिला आयोगाची समिती नाशिक टीसीएसमध्ये चौकशी करणार

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमधील लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरणाची दखल घेत आज राष्ट्रीय महिला आयोगाचे (NCW) उच्चस्तरीय पथक नाशिकमध्ये दाखल होत आहे. हे पथक थेट टीसीएस कंपनीच्या आवारात जाणून पाहणी करणार आहेत. या पथकात निवृत्त न्यायमूर्ती साधना जाधव, हरियाणाचे निवृत्त डीआयजी बी. के. सिन्हा, सुप्रीम कोर्टाच्या ॲडव्होकेट मोनिका अरोरा यांचा समावेश आहे. हे पथक केवळ पाहणीच करणार नाही, तर पीडित महिलांशी सविस्तर चर्चा करून आपला गोपनीय अहवाल आयोगाला सादर करणार आहे.

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस ( टीसीएस) कंपनीत हिंदू मुलींना टार्गेट करणे, त्यांना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे आणि विरोध केल्यास लैंगिक व मानसिक छळ करणे, असे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नियंत्रित केले जात होते. या प्रकरणाची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या 20 दिवसांपासून फरार असून, पोलीस तिच्या शोधासाठी तीन पथके तैनात केली आहेत. आतापर्यंत कंपनीच्या एचआर अश्विनी चैनानीसह 7 जणांना अटक करण्यात आली आहे.



महिला कर्मचाऱ्यांवरील कथित लैंगिक छळाच्या गंभीर प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वप्रेरणेने (suo motu) दखल घेतली आहे.माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालांनुसार, धार्मिक प्रथांशी संबंधित तक्रारीवरून सुरू झालेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. काही वरिष्ठ पदांवरील व्यक्तींनी महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक छळ, बलात्कार तसेच जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप समोर आले आहेत.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी National Commission for Women Act, 1990 च्या कलम 8 अंतर्गत आपले अधिकार वापरत सविस्तर चौकशीसाठी ‘फॅक्ट-फाइंडिंग कमिटी’ स्थापन केली आहे. ही समिती घटनास्थळी भेट देऊन तपास करणार आहे.

दरम्यान, नाशिक पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची सर्व महत्त्वाची कागदपत्रे आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवली आहेत. या प्रकरणामागे केवळ धर्मांतर नसून काही देशविघातक शक्तींचा हात आहे का? याचा तपास केला जाणार आहे. आरोपींना पैशांचा पुरवठा नेमका कुठून होत होता? परदेशातून या रॅकेटला आर्थिक मदत मिळत होती का? या ‘सोर्स’चा शोध NIA घेणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्लीतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणाशी या प्रकरणाचे काही धागेदोरे जुळतात का? याचीही पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे.

NCW committee to probe nashik TCS Unit

महत्वाच्या बातम्या