उद्धव ठाकरेंवर भाजप आणखी एक उपकार करणार, विधान परिषदेत बिनविरोध करणार?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भारतीय जनता पक्ष आणखी एक उपकार करणार असून ते विधान परिषदेच्या रिंगणात उतरल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे yanchi 2020 मध्ये विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नियुक्तीसाठी भाजपने सहकार्य केले होते. आता त्यांचा कार्यकाळ संपत असताना ते पुन्हा निवडणूक लढवणार असतील तर निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील 9 नियमित जागांसह एका पोटनिवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.



विधानसभेतील सध्याच्या संख्याबळाचा विचार केला तर भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली जाणार का, यावर संपूर्ण राजकीय समीकरण अवलंबून असल्याचे मानले जाते. पक्षांतर्गत पातळीवरही त्यांनी पुन्हा विधानपरिषदेत यावे, असा दबाव असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीकडे भाजपचे 231, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 40 असे एकूण भक्कम संख्याबळ आहे. या आधारावर महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 असल्याने त्यांना एकच जागा निश्चित मिळू शकते, तर दुसऱ्या जागेसाठी अतिरिक्त 10 मतांची गरज भासणार आहे, जी सध्या कठीण वाटते.

निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होईल, 30 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 2 मे रोजी छाननी होणार असून 4 मे ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 12 मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल.

BJP set to extend another favour to Uddhav Thackeray, may enable unopposed victory in Legislative Council?

महत्वाच्या बातम्या