विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nida Khan प्रसारमाध्यमांमध्ये ज्यांचा वारंवार उल्लेख टीसीएसच्या ( TCS) ‘एचआर व्यवस्थापक’ (HR Manager) म्हणून केला जात आहे, त्या निदा खान या एचआर व्यवस्थापक नाहीत. कर्मचारी भरती प्रक्रियेसाठीही जबाबदार नाहीत. . त्यांनी यापूर्वी ‘प्रोसेस त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे नेतृत्वविषयक अधिकार किंवा जबाबदाऱ्या नव्हत्या, असा खुलासा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने केला आहे.Nida Khan
नाशिकमधील टीसीएस कंपनीत घडलेल्या कथित लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतर प्रकरण उघड zalyane राज्याचे राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असतानाच, आता या प्रकरणावर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. “आम्ही या प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, सखोल चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सल्लागारांची नियुक्ती केली आहे. तसेच कंपनीच्या अंतर्गत पोर्टलवर या प्रकारच्या आरोपांची कोणतीही तक्रार यापूर्वी प्राप्त झालेली नव्हती.” अशी माहिती टीसीएसचे सीईओ आणि एमडी के. कृतीवासन यांनी एका निवेदनाद्वारे दिली आहे.Nida Khan
- संपूर्ण देशाचा राजकीय नकाशा बदलायची मोदींची तयारी; पण ठाकरे + पवार खेळत बसलेत घरातल्या घरात “खेळी”!!
या प्रकरणाच्या पारदर्शक चौकशीसाठी टीसीएसने मोठी पावले उचलली आहेत. टीसीएसच्या अध्यक्षा आणि सीइओ (COO) आरती सुब्रमण्यम यांच्या देखरेखीखाली ही अंतर्गत चौकशी सुरू आहे. कंपनीने ‘डेलॉईट’ (Deloitte) मधील तज्ज्ञांचे पथक आणि ‘ट्रायलीगल’ (Trilegal) या नामांकित विधी संस्थेची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी एक पर्यवेक्षण समिती स्थापन केली असून, टीसीएसचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री या समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. चौकशीचे निष्कर्ष या समितीसमोर सादर केले जातील.
नाशिक येथील आमचे युनिट (कार्यालय) आजही कार्यरत आहे आणि आमच्या ग्राहकांना सेवा देत आहे. हे युनिट बंद करण्यात आल्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्या पूर्णपणे असत्य आहेत. सविस्तर पुनरावलोकन प्रक्रिया अद्याप सुरू असली, तरी नाशिक युनिटशी संबंधित प्रणाली आणि नोंदींच्या प्राथमिक तपासणीवरून असे दिसून येते की, आमच्या ‘नैतिकता’ (Ethics) किंवा ‘POSH’ (लैंगिक छळ प्रतिबंधक) विषयक तक्रार निवारण माध्यमांवर आम्हाला अशा स्वरूपाची कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही, ज्या प्रकारचे आरोप सध्या केले जात आहेत.
कर्मचाऱ्यांचे कल्याण आणि संस्थात्मक आचारसंहिता यांबाबत TCS सर्वोच्च मानकांचे पालन करते. प्रत्येक कर्मचाऱ्याची सुरक्षा, प्रतिष्ठा आणि कल्याण यांसाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत. आम्ही यापूर्वीही स्पष्ट केल्याप्रमाणे, कोणत्याही प्रकारची सक्ती किंवा गैरवर्तन यांबाबत आमचे ‘शून्य-सहिष्णुता’ (Zero-tolerance) धोरण आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना आधार देणे आणि आमच्या सर्व कार्यस्थळांवर सुरक्षित व सन्मानजनक कामाचे वातावरण सुनिश्चित करणे, यावर आमचे लक्ष केंद्रित आहे.कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना (Law Enforcement Agencies) आम्ही आमचे पूर्ण सहकार्य देत आहोत; जेणेकरून या प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी होऊन, ते प्रकरण एका योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
Nida Khan not an hr manager, clarifies Tata Consultancy Services
महत्वाच्या बातम्या