विशेष प्रतिनिधी
नाशिक : woman sexually नाशिकमध्ये टीसीएस कंपनीमधील लव्ह जिहाद प्रकरणानंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.woman sexually
या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तंजीर इनामदारने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी नेले. तिथे आपल्याला बळजबरी दारू आणि सिगारेट पिण्यास भाग पाडले. पीडिता शुद्धित नसताना तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.woman sexually
आरोपी तंजीर इनामदारने पीडित तरुणीने आपल्या गळ्यात घातलेली तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरी तोडला होता. तसेच आरोपीने बळजबरीने एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे गजवा-ए-हिंदचे पालन करण्यास सांगून धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडित तरुणीच्या धार्मिक ओळखीवरच घाला घालण्याचे कारस्थान या आरोपीने केले होते.woman sexually
आरोपीने जानेवारी महिन्यात पीडित तरुणीच्या गळ्याजवळ चावा घेत हे लव्ह बाईट असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार विविध ठिकाणी लॉजवर नेत तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
संशयित आरोपी तंजीर इनामदारने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचेही लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तक्रारीवरून त्याच्यावर सध्या गुन्हा दाखल करण्यात अल असला तरी या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याची शक्यताही नाकारता येत नाही. तंजीर इनामदारला कोर्टात हजर करण्यात आले असून पोलिसांनी त्याच्या कोठडीची मागणी केली आहे.
woman sexually assaulted, conversion angle under probe in nashik
महत्वाच्या बातम्या