नाशिकमध्ये टीसीएसमधील महिला कर्मचाऱ्याची आपबिती, रझा मेमनकडून लैंगिक छळ

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नाशिकमध्ये सुरू असलेल्या टीसीएस धर्मांतर आणि छळ प्रकरणात रझा मेमनला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात आता चौथ्या पीडितेनेही पुढे येत आपला जबाब दिला आहे. रझा मेमनकडून झालेल्या लैंगिक छळाची आपबिती तिने पोलिसांसमोर मांडली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, मे २०२३ मध्ये ती प्रशिक्षण घेत असताना रझा मेमन तिच्याकडे आला. त्याने तिची वैयक्तिक माहिती विचारली. तिच्याशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न केला. “हे सगळं आपल्यातच ठेव,” असे सांगून तो तिला मेसेजवर उत्तर देण्यास सांगायचा. त्या वेळी ती नवीन असल्याने तिने कोणालाही काही सांगितले नाही.
रझा मेमन तिच्या मागे फिरायचा, परवानगीशिवाय स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आणि सतत विचित्र बोलायचा. ती एकटी असताना तो मुद्दाम तिच्याकडे बघत राहायचा आणि जबरदस्तीने संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.

पीडितेने ही बाब वरिष्ठांकडे मांडली, मात्र तिला फक्त “एकटी राहू नको, गटात राहा” असा सल्ला देण्यात आला. तिच्या तक्रारीवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

तक्रार केल्यामुळे रझा मेमनने सूड उगवत पीडितेची बदनामी केली. तिने सांगितले की, तिचे आणि एका सहकाऱ्याचे नाव जोडून ऑफिसमध्ये अफवा पसरवण्यात आल्या.


पीडितेचे नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न झाले. त्यानंतरही रझा तिच्या वैयक्तिक आयुष्यावर अश्लील आणि टोमणे मारत राहिला. तिने सांगितले की, “तो सतत माझ्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचा आणि अपमानास्पद प्रश्न विचारायचा.

पीडितेने आणखी एक गंभीर आरोप करत सांगितले की, रझा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सिस्टीममध्ये बदल करून तिच्यावर कामाचा ताण वाढवला. साधारणपणे ३० सेकंदांनी येणारे कॉल्स दर सेकंदाला येऊ लागले, ज्यामुळे तिच्यावर ताण वाढला.

पीडितेने वरिष्ठ अधिकारी अश्विनी चैनानी यांच्याकडे तक्रार केली, मात्र त्यांनी तिची तक्रार गांभीर्याने घेतली नाही, असा आरोप आहे. “तुम्हाला बातम्यांमध्ये यायचे आहे का?” असे म्हणत तक्रार दुर्लक्षित करण्यात आली, असे पीडितेने सांगितले.

रझा मेमनला अटक करण्यात आली असून पुढील चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Female TCS employee in Nashik alleges sexual harassment by Raza Memon

महत्वाच्या बातम्या