सरकारचा मोठा निर्णय! फक्त रिक्षा आणि कॅब नव्हे तर,”या”वाहनचालकांना मराठी बंधनकारक…

विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा बंधनकारक केली आहे.सरकारच्या निर्णयानंतर मुंबई आणि ठाण्यातील संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे.मनसेकडून देखील मराठी भाषेच्या सक्तीसाठी आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.अनेक घडामोडी घडत असताना राज्य सरकारकडून कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रिक्षा आणि टॅक्सी चालकांप्रमाणेच राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील प्रवाशांची संवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्व सांगत सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून तयार करण्यात आला आहे. प्रस्तावंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावात करण्यात आली आहे.राज्याचा परिवहन आयुक्तांनी या निर्णयासंदर्भात प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.



प्रस्तावात काय बदल?

प्रस्तावातील बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याची परवानगी देताना अर्जदाराचे चारित्र्य आणि पार्श्वभूमीसोबतच मराठी भाषेचे असलेले ज्ञान तपासून घेण्याचा अधिकारी परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे.नवीन नियमांनुसार आता,सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याची परवानगी देताना मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही,हे तपासले जाणार आहे.

मीटर असलेल्या वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान गरजचे आहे.महत्वाच म्हणजे ऑटो आणि टॅक्सी चालकांच्या परवाना नूतनीकरणावेळी मराठी भाषा बोलता येते,हे दाखवणे बंधनकारक आहे.

निर्णयाबद्दलची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या अगोदर मिळणाऱ्या सर्व सूचनांचा सरकारकडून विचार केला जाणार आहे.

Government’s big decision! Marathi is mandatory for not only rickshaw and cab drivers but also for “these” vehicles…

महत्वाच्या बातम्या