पुण्यातील आयएलएस कॉलेजच्या वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार, पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील नामांकित आयएलएस लॉ कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महा रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

आदित्य सिंग, सुमीत गायकवाड, राजवंश देशमुख, स्वराज गायकवाड आणि उज्वल राज (वय अंदाजे २०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एलएलबी द्वितीय वर्षाचा ३५ वर्षीय विद्यार्थ्याने फिर्याद दिली आहे.



पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत लॉ कॉलेज रोडवरील आयएलएस कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहात हा प्रकार घडला. दिलेल्या तक्रारीनुसार काही विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर रॅगिंग केल्याचा आरोप आहे.

या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी महा रॅगिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ आणि ४ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Shocking ragging incident at ILS College hostel in Pune, case registered against five students

 

महत्वाच्या बातम्या